दिग्गज भारतीय क्रिकेटपटूचे पिता तुरुंगात, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये केला घोटाळा, कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप
ग्राम जौलखेडाच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank Of Maharashtra) शाखेमध्ये ते पदावर होते. तत्कालिन बँक मॅनेजरवर फसवणूक आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विकेटकीपर फलंदाज नमन ओझा (Naman ojha) याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. विनय ओझा (Vinay ojha) यांच्यावर सव्वा कोटी रुपये हडपल्याचा आरोप आहे. सोमवारी संध्याकाळी मध्य प्रदेश बैतूल येथील मुलताई मधून विनय ओझा यांना पोलिसांनी अटक केली. ग्राम जौलखेडाच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank Of Maharashtra) शाखेमध्ये ते पदावर होते. तत्कालिन बँक मॅनेजरवर फसवणूक आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल आहे. पोलीस विनय ओझा यांच्या मागावर होते. अखेर 6 जूनच्या संध्याकाळी हा शोध संपला. बैतूल येथील मुलताईमधून विनय ओझा यांना अटक करण्यात आली. आज त्यांना कोर्टात हजर केले जाऊ शकते. एसडीओपी नम्रता सोंधिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक दिवसाच्या रिमांडवर घेण्यात आलं आहे. 2013 सालचा हा घोटाळा आहे.
घोटाळा काय केला?
जौलखेडा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये अभिषेक रत्नन बँक मॅनेजर होते. ते, विनय ओझा आणि अन्य आरोपींनी मिळून बनावट नाव आणि फोटोंच्या आधारे किसान क्रोडिट कार्ड बनवलं. त्या आधारावर बँकेतून पैसे मिळवले. शेतकऱ्यांच्या नावे खोटी किसान क्रेडिट कार्ड बनवून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप आहे.
वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल
बँकेतून पैसे काढल्यानंतर बँक मॅनेजर अभिषेक रत्नम, विनय ओझा, लेखपाल निलेश छलोत्रे, दीनानाथ राठोरसह अन्य आरोपींनी रक्कम आपसात वाटून घेतली. हा घोटाळा उघड झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी अभिषेक रत्नम, विनय ओझा, निलेश छलोत्रे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कलम 409, 420, 467,468, 471, 120 बी आणि आयटी कायदा कलम 65,66 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तत्कानिल बँक मॅनेजर अभिषेक रत्नम, निलेश छलोत्रे यांना आधीच अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा फरार होते. सोमवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली.
नमन ओझाने कधी स्वीकारली निवृत्ती?
विनय ओझा यांचा मुलगा नमन ओझा हे क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. नमनने फेब्रुवारी 2021 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. एसडीओपी नम्रता सोंधिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडिल विनय ओझा यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना एक दिवसाचा रिमांड सुनावला आहे.