Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा अचानक झाला अब्जाधीश, उत्तराधिकारी म्हणून घोषित

भारताचा माजी क्रिकेटपटू अचानक अब्जाधीश झाला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे अचानक कसं झाले. अजय जडेजा याने अनेक सामन्यांमध्ये निर्णायक खेळी करत भारताला विजयी केले आहे. पण आता इतक्या वर्षानंतर अजय जडेजा अचानक करोडपती झाला जाणून घ्या.

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा अचानक झाला अब्जाधीश, उत्तराधिकारी म्हणून घोषित
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 9:28 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने भारतासाठी अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. आता क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर शाही दरबारातही त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी त्याला गुजरातच्या जामनगरच्या शाही सिंहासनाचे वारस म्हणून घोषित करण्यात आले आहे. 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आलीये. अजय जडेजाच्या संपत्तीमध्ये यामुळे अचानक मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार, त्याची एकूण संपत्ती आता ₹1,450 कोटींच्या पुढे गेली आहे. जर हा आकडा बरोबर असल्याचे सिद्ध झाले, तर जडेजाची संपत्ती आता विराट कोहलीच्या संपत्तीपेक्षा जास्त (अंदाजे ₹ 1,000 कोटी) होईल. आता अजय जडेजा भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू बनला आहे.

अजय जडेजाचा शाही वारसा

अजय जडेजा याचे काका, महाराजा शत्रुशल्य सिंग जडेजा यांनी 12 ऑक्टोबर रोजी औपचारिकपणे अजय जडेजाला आपला उत्तराधिकारी घोषित केलंय. शत्रुशल्यसिंग हे अजय जडेजाचे वडील दौलतसिंहजी यांचे चुलत भाऊ आहेत. 1971 ते 1984 पर्यंत ते खासदार राहिले आहेत. महाराजा शत्रुशल्य सिंग यांनी 1966 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर नवानगरचे राज सिंहासन स्वीकारले होते. ते स्वतः क्रिकेटपटू राहिले आहेत आणि 1966-67 च्या रणजी ट्रॉफी हंगामात ते सौराष्ट्र संघाचे कर्णधार होते. याशिवाय त्यांनी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचेही नेतृत्व केलंय.

क्रिकेट ते राजघराण्यापर्यंतचा प्रवास

हे राजघराणे नवानगरचे शासक आणि क्रिकेट दिग्गज रणजितसिंह जडेजा यांचे वंशज आहेत. ज्यांनी 1907 ते 1933 पर्यंत नवानगरवर राज्य केले. अजय जडेजा केवळ श्रीमंतच नाही तर गौरवशाली क्रिकेट आणि राजेशाही इतिहासाचा एक भाग आहे.

अजय जडेजाला क्रिकेटचा वारसा

अजय जडेजाचा जन्म 1 फेब्रुवारी 1971 रोजी जामनगरच्या राजघराण्यात झाला. त्याचे वडील दौलतसिंहजी जडेजा हे तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. जडेजा ज्या राजघराण्याशी संबंधित आहे त्यांना क्रिकेटचा समृद्ध वारसा आहे. त्यांच्या कुटुंबात महान क्रिकेटपटू के.एस. रणजितसिंहजी आणि के.एस. दिलीपसिंहजी यांचा समावेश आहे. ज्यांच्या नावावर रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी अशी नावे आहेत.

अजय जडेजाची क्रिकेट कारकीर्द बरीच चर्चेत होती. 90 च्या दशकात भारतीय क्रिकेटच्या खेळात निर्णायक भूमिका बजावणारा तो खेळाडू होता. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध होता. 1992 ते 2000 दरम्यान त्याने 15 कसोटी सामने आणि 196 एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये फिनिशर म्हणून ओळखला जात असे. त्याने जवळपास 6,000 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. ज्यात 6 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.

'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.