Birthday Special : जन्मानंतर रुग्णालयातच बदली झाला, पुढे जाऊन जगातील महान फलंदाज बनत गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरला, 4 सामन्यांत 774 धावा ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू
तब्बल 17 वर्षे भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर असणाऱ्या या फलंदाजाने जगभरातील गोलंदाजाना शेकडो धावा ठोकल्या होत्या. भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार असणाऱ्या या फलंदाजाचा आज वाढदिवस
मुंबई : वर्ष 1949… बॉम्बेच्या (आता मुंबई) पुरंदरिया रुग्णालयात एक मुलाचा जन्म झाला. बरेच नातेवाईक मुलाला पहायला आले होते. त्यातील एकाने पाहिलं बाळाच्या कानावर एक छोटेसे छिद्र आहे. काही दिवसांनी पुन्हा तो नातेवाईक तिथे आला असता त्याला ते छिद्र न दिसल्याने त्याने लगेचच सर्वांना कळवले. नातेवाईकांनी रुग्णालयात हंगामा केला असता बाळाला शोधण्यात आले आणि एका मासे विकणारीकडे लहानगा सापडला. 22 वर्षानंतर हाच लहानगा जागतिक क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज बनला ज्याने भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार खांद्यावर उचलत संपूर्ण जगातील गोलंदाजाना अक्षरश: धुवून काढलं. याच खेळाडूचा आज जन्मदिवस असून त्याच नाव आहे सुनील गावस्कर (Sunil Gavaskar). आजच्याच दिवशी म्हणजे 10 जुलै 1949 रोजी गावस्कर यांचा जन्म झाला होता. त्यांनी स्वत:च वरील घटना त्यांच्या पुस्तकात सांगितली असून जर तेव्हा नशीबाने साथ दिली नसती तर ते क्रिकेट खेळण्या ऐवजी मच्छिमार झाले असते असंही त्यांनी म्हटलं आहे.
1983 World Cup-winner ? 233 international games ? 13,214 international runs ? First batsman to register 10,000 runs in Tests ?
Here’s wishing Sunil Gavaskar – former #TeamIndia captain & one of the finest batsmen to have ever graced the game – a very happy birthday. ? ? pic.twitter.com/8tQeMlCbSn
— BCCI (@BCCI) July 10, 2021
सुनील गावस्कर हे शालेय जीवनात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत. त्यानंतर त्यांच्या शाळेचे कर्णधार मिलिंद रेगे यांनी त्यांना एकदा सलामीला पाठवलं आणि नंतर ते कायम त्याच जागेवर खेळू लागले. स्थानिक क्रिकेटमध्ये अप्रतिम फलंदाजीनंतर 1971 साली वेस्ट इंडीज दौऱ्यावर गावस्कर यांचे भारतीय संघात पदार्पण झाले. पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे गावस्कर खेळू शकले नाही. पण पोर्ट ऑफ स्पेनच्या दुसऱ्या कसोटीत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिल्या सामन्यात 65 आणि नाबाद 67 धावांची खेळी केली. भारताला विजय मिळवून देत त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या फलंदाजीने वेस्ट इंडिज संघाला सळो की पळो केले आणि 4 सामन्यांच्या मालिकेत तीन शतक आणि एक दुहेरी शतक ठोकत 774 धावा केल्या. सलामीच्या मालिकेत इतका मोठा स्कोर करण्याचा गावस्करांचा रेकॉर्ड आजही कोणी तोडू शकलेले नाही.
17 वर्षे जगभरातील गोलंदाजावर केलं राज्य
पहिल्या मालिकेतील अप्रतिम कामगिरीनंतर पुढील 17 वर्षे गावस्कर भारताचे सलामीवीर राहिले. त्याकाळात विना हॅल्मेट क्रिकेट खेळले जात आणि अशातही गावस्करांनी न घाबरता अत्यंत खरनाक गोलंदाजाविरुद्ध धावांचे डोंगर उभे केले. त्यामुळेच निवृत्त होताना गावस्करांच्या नावावर अनेक रेकॉर्ड होते. त्यांनी टेस्टमध्ये सर्वाधिक शतकं (34) आणि धावांचा (10122) रेकॉर्ड बनवला. ते जगातील पहिले फलंदाज ठरले ज्यांनी तीन वेळा एका कसोटीतील दोन्ही डावांत शतक ठोकले. 10 हजार टेस्ट रन बनवणारेही ते पहिलेच फलंदाज ठरले. यष्टीरक्षक नसूनही त्यांनी कसोटीत 100 झेल टिपले होते.
ही वाचा :
(Former Indian Cricketer Sunil Gavaskar Birthday Today Know some Unknown Things About Gavaskar)