विराटला निवृत्तीनंतर मिळणारी ‘ही’ गोष्ट आताच मिळाली, कोहलीबाबत युवराज सिंगने केलं मोठ वक्तव्य

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर युवराजने एक खास वक्तव्य केलं आहे.

विराटला निवृत्तीनंतर मिळणारी 'ही' गोष्ट आताच मिळाली, कोहलीबाबत युवराज सिंगने केलं मोठ वक्तव्य
युवराज सिंगने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 3:26 PM

मुंबई : सध्या दिग्गज खेळाडू असलेला भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली इंग्लंडमध्ये आहे. 4 ऑगस्टपासून भारत इंग्लंडसोबत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सध्याच्या क्रिकेटर्समधील सर्वात उत्तम फलंदाज असणाऱ्या विराटला WTC Final मध्ये विजय मिळवता आला नाही. त्यात मागील दोन वर्षापासून त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक ठोकता आलेलं नाही. या सर्वांमुळे त्याला घेऊन भारतात बऱ्याच चर्चांना उधान आलं आहे. याच चर्चांमध्ये भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) देखील कोहलीबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

युवराज सिंगच्या मते क्रिकेटर्सना निवृत्तीनंतर जो सन्मान मिळतो, ते जसे दिग्गज म्हणवले जातात. ते सर्व विराटला आताच 30 वर्षाच्या वयात मिळालं आहे. युवराजने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाल, ”विराटने अनेक रेकॉर्ड केले आहेत. बऱ्याच चुरशीच्या सामन्यात संघाला सावरलं आहे. त्याच्यातील टॅलेंटमुळे 2011 च्या वर्ल्ड कप संघातही अत्यंत कमी वयात त्याला संधी देण्यात आली होती. संघ व्यवस्थापनाला तेव्हा विराट आणि रोहितमध्ये एकाला निवडायचे होते. पण विराटले खूप सारे रन केले होते त्यामुळे त्याचीच निवड करण्यात आली.”

कर्णधार झाल्यावर फलंदाजीत आणखी सुधार – युवी

युवराजने मुलाखतीत पुढे म्हणाला, ”मी विराटला मोठं होताना पाहिलं आहे. त्याला नेट्समध्ये ट्रेनिंग करताना पाहिलं आहे. तो आपल्या क्रिकेटसह फिटनेसला उत्तम ठेवण्यासाठी फार मेहनत करतो. त्याच्यामध्ये जगातील बेस्ट फलंदाज होण्याचे गुण आहेत. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतरही त्याची फलंदाजी आणखीच सुधारली”

विराट इंग्लंडवर विजय मिळवण्यासाठी सज्ज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) भारतीय संघ न्यूझीलंडकडून पराभूत झाला. मात्र आता यंदाच्या WTC ची सुरुवात विजयाने करण्यासाठी विराट कोहली इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. सोबतच मागील दोन वर्षांपासून न ठोकू शकलेल्या शतकाच्या प्रतिक्षेतही कोहली असून या मालिकेत पुन्हा शतकांची मालिका सुरु करण्यासाठी कोहली जीवाचे रान करणार हे नक्की!

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

हे ही वाचा

CSXI vs IND, Other Test Live Streaming: विराटची टोळी खेळणार पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs ENG : दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, लवकरच टीम इंडियात पुनरागमन

India vs Sri Lanka, 2nd ODI live streaming: भारत विरुद्ध श्रीलंका, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

(Former Indian Cricketer Yuvraj Singh says Virat kohli become Legend before retirement at age of 30)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.