भारतीय संघाचा खेळ सुधारण्यासाठी BCCI चा ‘हा’ निर्णय योग्यच, माजी भारतीय क्रिकेटपटूकडून कौतुक

भारतीय संघाने कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली 1983 साली विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. आजच्या घडीला भारतीय क्रिकेट संघ जगातील टॉपच्या संघामध्ये मोडतो.

भारतीय संघाचा खेळ सुधारण्यासाठी BCCI चा 'हा' निर्णय योग्यच, माजी भारतीय क्रिकेटपटूकडून कौतुक
BCCI
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 1:04 PM

मुंबई : सर्वात आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगची (IPL) सुरुवात केली आणि जगभरातील देशांमध्ये क्रिकेट लीग्सचा जणू पुरत आला. प्रत्येक देशांनी त्यांच्या क्रिकेट लीग सुरु केल्या आहेत.  पण आजही सर्वात श्रीमंत लीग म्हणून आयपीएललाच ओळखलं जातं. पण अशातच बीसीसीआय भारतीय खेळाडूंना दुसऱ्या देशाच्या लीगमध्ये खेळायची परवानगी देत नसल्याने यावर अनेकजण प्रश्न उपस्थित करतात. पण भारताची माजी यष्टीरक्षक फलंदाज सबा करीमने (Saba Karim) बीसीसीआयचा हा निर्णय अगदी योग्य असल्याचे सांगत त्याचे कारणही दिली आहे.

सबा करीम म्हणाल्या, ”बीसीसीआय आपल्या खेळाडूंना केवळ स्थानिक स्पर्धाच खेळू देत असल्याने खेळाडूंना तिन्ही प्रकारच्या फॉर्मेटसाठी चांगल्याप्रकारे तयार करत आहे. कारण काही देशाचे खेळाडू उदाहरणार्थ वेस्ट इंडीजचे खेळाडू देशभराती सर्व लीगमध्ये खेळतात. त्यामुळे देशाकडून खेळताना त्यांचा खेळ तितका खास नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंना केवळ भारतातील स्पर्धांमध्ये खेळू देण्याचा बीसीसीआयचा निर्णय खेळाडूंसाठीच फायद्याचा आहे.”

BCCI कडून देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये रणजी करंडक स्पर्धेचा 2021-22 चे सत्र 5 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान खेळले जाईल. कोविड -19 च्या साथीमुळे गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले नव्हते. कारण 38 संघांसाठी बायो बबल तयार करण्यात ‘लॉजिस्टिक’ अडथळ्यांना सामोरे जावे लागले असते. बीसीसीआयच्या देशांतर्गत कॅलेंडरच्या या सत्रात रणजी ट्रॉफी खेळली जाईल. पण वरिष्ठ पुरुष क्रिकेटची सुरुवात 27 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडकाने होईल, जी सर्वोत्तम क्रिकेटपटूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग नंतर आयोजीत केली जाईल.

इतर बातम्या

VIDEO : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी साजरं केलं रक्षाबंधन, अर्जून तेंडुलकरने दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा

इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो ‘Unlucky’, ‘हे’ आहे त्यामागील कारण

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

(Former indian player saba karim explains how bcci not allowing indian players to play in other countrys league is beneficial)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.