IND vs PAK: ‘पाकिस्तान फेव्हरेट, आम्हीच जिंकणार’, पाकच्या माजी कर्णधाराच बेधडक वक्तव्य

IND vs PAK: पाकिस्तान या मॅच मध्ये विजयासाठी फेव्हरेट असल्याचा दावा केला. भारतीय संघ ग्रुप बी मध्ये आहे. आशिया कप क्वालिफायर्स मधील आणखी एक संघ या गटात येईल.

IND vs PAK: 'पाकिस्तान फेव्हरेट, आम्हीच जिंकणार', पाकच्या माजी कर्णधाराच बेधडक वक्तव्य
ind vs pakImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 3:07 PM

मुंबई: आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा, भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना 28 ऑगस्टला संयुक्त अरब अमिराती मध्ये रंगणार आहे. एक्सपर्ट आणि माजी क्रिकेटपटुंनी या हाय वोल्टेज महामुकाबल्याआधी कमेंट करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने (Sarfaraz Ahmed) पाकिस्तान या मॅच मध्ये विजयासाठी फेव्हरेट असल्याचा दावा केला. भारतीय संघ ग्रुप बी मध्ये आहे. आशिया कप क्वालिफायर्स मधील आणखी एक संघ या गटात येईल. टी 20 च्या शॉर्टर फॉर्मेट मध्ये दोन्ही संघांचे हेड टू हेड सामने बघितलेत, तर भारतीय संघाची बाजू वरचढ आहे. भारताने सहा सामने जिंकलेत, त्याचवेळी पाकिस्तानला फक्त दोनदा विजय मिळवता आला आहे.

वर्ल्ड कप मधल्या सामन्याचं दिलं उदहारण

याआधी भारत आणि पाकिस्तान मध्ये शेवटचा टी 20 सामना मागच्या वर्षी टी 20 वर्ल्ड कप मध्ये झाला होता. ज्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. पाकिस्तानने 10 विकेटने एकतर्फी विजय मिळवला होता. कुठल्याही वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानकडून झालेला भारताचा हा पहिला पराभव होता. याच सामन्याचं उद्हारण देऊन, आशिया कप मधील पहिल्या सामन्याआधी पाकिस्तानच मनोधैर्य उंचावलेलं असेल, असा दावा सरफराज अहमदने केला. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

पाकिस्तानकडे जास्त आत्मविश्वास असल्याचा दावा

“कुठल्याही स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून अभियानाची दिशा ठरते. आमचा पहिला सामना भारताविरोधात आहे. मागच्यावेळी पाकिस्तानने याच मैदानात भारताचा पराभव केला होता, त्यामुळे निश्चितच पाकिस्तानच मनोधैर्य उंचावलेले असले ते आत्मविश्वासाने भारताला सामोरे जातील” असं सरफराज स्पोर्ट्स पाकटीव्हीशी बोलताना म्हणाला.

पाकिस्तानी संघाकडे अनुभव जास्त

“PSL मध्ये खेळल्यामुळे पाकिस्तानी संघाला यूएई मधली परिस्थिती चांगली माहित आहे. त्यामुळे ते भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत” असं सरफराज अहमद म्हणाला. “भारतीय खेळाडूंनाही यूएई मधल्या परिस्थितीची कल्पना आहे. पण पाकिस्तानी संघाकडे अनुभव जास्त आहे. पाकिस्तानने आपल्या अनेक होम सीरीज यूएई मध्ये खेळल्या आहेत” असं अहमदने सांगितलं.

सरफराज काय म्हणाला?

“पाकिस्तानी खेळाडू इथे पीएसएल लीगचे सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांना इथली परिस्थिती माहित आहे. हो, भारतही इथे आयपीएल स्पर्धा खेळलाय. पण अशा वातावरणात खेळण्याचा त्यांच्या खेळाडूंकडे इतका अनुभव नाहीय” असं सरफराजने सांगितलं.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.