VIDEO : पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचं तालिबान समर्थनार्थ वक्तव्य, अफगाणिस्तान क्रिकेटवरही प्रतिक्रिया, म्हणाला…
शाहिद आफ्रिदेच्या या वक्तव्यामुळे अनेक अफगाणी बांधवाची मनं दुखावली जाऊ शकतात. क्रिकेटपटू राशिद खान, मोहम्मद नबी यांच्याकडूनही या वक्तव्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
कराची : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) त्याची प्रतिक्रिया देताना एक वेगळचं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे अनेक अफगाणि नागरिकांची मनं दुखावली जाऊ शकतात.
आफ्रिदीने तालिबान्यांच्या बाजून बोलताना म्हटलं आहे की, ‘तालिबानी यावेळी सकारात्मक पद्धतीने समोर आले आहेत. कारण त्यांनी महिलांना राजकारणात आणि नोकरीनिमित्त बाहेर पडण्याची परवानगीही दिली आहे.” तसंच अफगाणिस्तान क्रिकेटबद्दल शाहिद म्हणाला, ”तालिबान यावेळी क्रिकेटला पूर्ण पाठिंबा देत आहे. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे तो दौरा रद्द झाला असला तरी तालिबान क्रिकेटला संपूर्ण पाठिंबा देत आहे.”
❝Taliban have come with a very positive mind. They’re allowing ladies to work. And I believe Taliban like cricket a lot❞ Shahid Afridi. He should be Taliban’s next PM. pic.twitter.com/OTV8zDw1yu
— Naila Inayat (@nailainayat) August 30, 2021
राशिद काय म्हणणार?
अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू मागील अनेक दिवस या प्रकरणावर वक्तव्य करत आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या सर्व परिस्थितीमुळे तणावाखाली असणाऱ्या राशिदने त्याच्या इन्स्टास्टोरीतून आपल्या भावनाही व्यक्त केल्या. त्याने रडण्याचे इमोजी टाकत मी नीट झोपूही शकत नाही असं लिहिलं होतं. दरम्यान आता या सर्वावर शाहिदने दिलेल्या या वक्तव्यावर राशिद काही प्रतिक्रिया देतो का? हे पाहावं लागेल.
हे ही वाचा
अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात, स्टार क्रिकेटपटू राशीद खानचं कुटुंब अडकलं, इंग्लंडमध्ये धाकधूक
(Former Pakistan Cricketer Shahid afridi says Taliban came with positive mindset)