IND vs SL | पाकिस्तानी क्रिकेटपटूचा रडीचा डाव, शमी-सिराजबद्दल केली थेट अशी मागणी, VIDEO

IND vs SL | भारताची बळकट गोलंदाजी पाहून पाकिस्तानात अनेकांना पोटदुखीचा त्रास सुरु झालाय. एका माजी पाकिस्तानी क्रिकेटरने पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या एका शो मध्ये नको ते वक्तव्य केलं. भारताची कामगिरी पाहून या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना डोळ्यांवर विश्वास बसत नाहीय.

IND vs SL | पाकिस्तानी क्रिकेटपटूचा रडीचा डाव, शमी-सिराजबद्दल केली  थेट अशी मागणी, VIDEO
Ind vs Sl odi World cup 2023 Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 2:10 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया उत्तम कामगिरी करतेय. रोहितच्या टीमने टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. सगळ्याच मॅचमध्ये विजय मिळवलाय. 14 पॉइंट्ससह टीम इंडिया टॉपवर आहे. टीम इंडियाने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध सातवा सामना जिंकला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. टीम इंडियाने 302 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात मोहम्मह सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तिघांनी मिळून 9 विकेट काढले. शमीने 5, सिराजने 3 आणि बुमराहला एक विकेट मिळाला.

भारताची ही बळकट गोलंदाजी पाहून पाकिस्तानात पोटदुखी सुरु झालीय. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन रजाने मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला सोपवल्या जाणाऱ्या चेंडूची चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या एका शो मध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. शो मध्ये अँकरने हसन रजा यांना प्रश्न विचारला. चेंडू वेगळे असतात का?. कारण भारतीय गोलंदाजांना ज्या पद्धतीचा स्विंग मिळतोय, ते पाहून असं वाटतय की, ते बॉलिंग पीचवर गोलंदाजी करतायत. त्यांना खूप चांगला स्विंग मिळतो.

तो फार मोठा क्रिकेटर नाहीय

“टीम इंडियाची गोलंदाजी सुरु होते, तेव्हा DRS चा निर्णयही भारताच्या बाजूने होतो. 7-8 DRS खूप क्लोज होते. त्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागला. गोलंदाजीबद्दल बोलायच झाल्यास शमी-सिराज एलन डोनाल्ड, एनटिनी इतके घातक झालेत. मला वाटतं की, दुसऱ्या इनिंगमध्ये चेंडू सुद्धा बदलतो. चेंडूची तपासणी झाली पाहिजे” असं हसन रजाने म्हटलं. भारतीय गोलंदाजांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हसन रजा फार मोठा क्रिकेटर नाहीय. त्याने फक्त 7 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यात 27 च्या सरासरीने 235 धावा केल्यात. 16 वनडेमध्ये 242 धावा त्याच्या नावावर आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.