‘कधीतरी असाच वेळ बेस्ट फ्रेंड SBI साठी सुद्धा काढं’, ख्रिस गेल सोबतच्या फोटोवरुन नेटीझन्सनी Vijay Mallya ला सुनावलं

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. विजय मल्ल्या (Vijay Mallya) आपल्या ऐशोआरामी लाईफस्टाइलसाठी ओळखला जायचा.

'कधीतरी असाच वेळ बेस्ट फ्रेंड SBI साठी सुद्धा काढं', ख्रिस गेल सोबतच्या फोटोवरुन नेटीझन्सनी Vijay Mallya ला सुनावलं
vijay mallya-chris gayleImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 4:13 PM

मुंबई: भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. विजय मल्ल्या (Vijay Mallya) आपल्या ऐशोआरामी लाईफस्टाइलसाठी ओळखला जायचा. मद्य सम्राट अशी त्याची ओळख होती. हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे पुढे त्याची कारकीर्द उतरणीला लागली. याच विजय मल्ल्याया क्रिकेट, फॉर्म्य़ुला 1 मध्येही रस होता. आयपीएलमधल्या (IPL) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची मालकी विजय मल्ल्याकडे होती. या टीम मधील ख्रिस गेल हा त्याचा आवडता खेळाडू. नुकतीच विजय मल्ल्याने लंडनमध्ये ख्रिस गेलची (Chris Gayle) भेट घेतली. मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. ख्रिस गेल सुद्धा सध्या फ्री आहे. तो लंडनमध्ये आला होता. त्यावेळी विजय मल्ल्याने त्याची भेट घेतली. विजय मल्ल्याने बुधवारी टि्वटरवरुन दोघांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला.

विजय मल्ल्याने टि्वटमध्ये काय म्हटलं?

“माझा मित्र युनिव्हर्स बॉस ख्रिस्तोफर हेनरी गेलला भेटून आनंद झाला. ख्रिस गेलला RCB च्या संघात घेतल्यापासून आमची चांगली मैत्री आहे. कुठल्याही खेळाडूच केलेलं हे सर्वोत्तम अधिग्रहण आहे” असं मल्ल्याने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. हे टि्वट लगेच व्हायरल झालं व त्याला हजारो लाइक्सही मिळाले. 2011 ते 2017 पर्यंत ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळला. तो या काळात आरसीबीसाठी अनेक संस्मरणीय इनिंग्स खेळला.

गेलने आरसीबीकडून खेळताना किती धावा केल्या?

RCB कडून आयपीएलमध्ये खेळतान ख्रिस गेलने 91 सामन्यात 154.40 च्या स्ट्राइक रेटने 3420 धावा केल्या. यात 21 अर्धशतक आणि पाच शतक आहेत. गेलने आरसीबीकडून खेळतानाच नाबाद 175 धावा केल्या होत्या. आरसीबीची साथ सोडल्यानंतर गेल पंजाब किंग्सकडून खेळला. IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये तो सहभागी झाला नव्हता. मात्र आयपीएल 2023 मध्ये ख्रिस गेल खेळताना दिसू शकतो.

बेस्ट फ्रेंड SBI ला ही भेट

विजय मल्ल्याने हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलय. कधीतरी असाच वेळ काढून आपले बेस्ट फ्रेंड स्टेट बँक ऑफ इंडिया वाल्यांनाही भेटून घे असं एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.