Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 मध्ये नाव कमावणाऱ्या अकोल्याच्या मुलाबद्दल इयन बिशप म्हणाला, ‘तुम्ही त्याला….’

IPL 2023 : महाराष्ट्रातील अकोल्याच्या मुलाबद्दल बोलताना इयन बिशपने, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच उदहारण दिलं. महाराष्ट्राच्या या मुलाने भविष्यातल्या स्टारची चुणूक दाखवून दिलीय. त्यामुळे त्याच्या खेळावर लक्ष आहे.

IPL 2023 मध्ये नाव कमावणाऱ्या अकोल्याच्या मुलाबद्दल इयन बिशप म्हणाला, 'तुम्ही त्याला....'
Ian Bishop MIImage Credit source: IPL/ANI
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 1:12 PM

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी पंजाब किंग्सच्या प्लेऑफच्या अपेक्षांना झटका दिला. धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबला 15 धावांनी हरवलं. दिल्ली कॅपिटल्सची टीम आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. दिल्लीने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 213 धावा केल्या. पंजाब किंग्सने 8 बाद 198 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक (96) धावा केल्या.

या मॅचमध्ये पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन शुन्यावर बाद झाला. अर्थव तायडेने (55) धावा करुन पंजाब किंग्सच्या इनिंगला स्थैर्य दिलं. अर्थव तायडेने चांगली सुरुवात केली. पण आवश्यक धावगती सतत वाढत होती. 23 वर्षाचा युवा अर्थव सतत चौकार मारण्यासाठी संघर्ष करताना दिसत होता.

म्हणून पंजाबने केलं रिटायर्ड आऊट

त्यामुळे पंजाबच्य टीम मॅनेजमेंट 15 व्या ओव्हरमध्ये अर्थवला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याजागी पावरहिटर जितेश शर्माला पाठवण्यात आलं. अर्थव ड्रेसिंग रुममध्ये येत असताना, पंजाब टीमच्या सदस्यांनी त्याचं कौतुक केलं. वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयन बिशपने अर्थव तायडे जी इनिंग खेळला, त्या बद्दल त्याचं कौतुक केलं. अर्थव रिटाय़र्ड आऊट झाला, त्यातून त्याला शिकण्यासारख बरच काही आहे, असं बिशप म्हणाले.

‘तो त्याच्या खेळातून शिकेल’

“तायडे तरुण आहे. तो काही सामन्यात खेळला, काही मॅच बाहेर होता. अर्थव नेहल वढेरासारखाच आहे. यातून तो शिकेल. अजून चांगला प्लेयर म्हणून तयार होईल. कोणीही त्याच्याबरोबर कठोरपणे वागू नये. तो त्याच्या खेळातून शिकेल” असं इयन बिशप म्हणाले. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या नेहल वढेराला मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 20 चेंडूत 16 धावांवर तो आऊट झाला. 178 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची टीम 5 धावांनी हरली, नेहलने या सीजनमध्ये चांगला खेळ दाखवलाय. त्याच्यामध्ये पावर हिटिंगची क्षमता आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.