मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये अनेक घडामोडी घडल्या. सट्टेबाजीचाही आरोप लावण्यात आला. यावरुन सोशल मीडियावर ट्रेलही करण्यात आलं. या सीजनमध्ये दोन नवीन संघ आले. लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) हे ते दोन नविन संघ होते. पहिल्यांदाच सहभागी झाले असले तरी त्यांची कामगिरी चांगली होती. एलिमिनेटरमध्ये लखनौचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभूत झाला. तर गुजरातने क्वालिफायर-1 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्क केलं होतं. राजस्थानने क्वालिफायर 2 मध्ये आरसीबीला नॉकआऊट करून अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केले. मात्र, विजेतेपदाच्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला. हार्दिक पंड्याचा संघ पहिल्याच सत्रात चॅम्पियन ठरला हे विशेष. नवीन संघांच्या आगेकूचीनंतरु दुसरीकडे नवे वादही समोर आले. यातीलच काही वाद आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
22 एप्रिलला यपीएलचा 34 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला होता. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावा करायच्या होत्या. रोव्हमन पॉवेलने ओबेड मॅकॉयच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर हा वाद झाला. मॅकॉयचा चेंडू फुल टॉस होता. पॉवेलला वाटले की तो कमरेच्यावर असल्याने नो-बॉल द्यावा. पॉवेलने अपील केले. पण, मैदानावरील पंचांनी नो-बॉल दिला नाही. यामुळे डगआउटमध्ये बसलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत संतापला आणि त्याने दोन्ही फलंदाजांना बाहेर येण्याचे संकेत दिले. नंतरचे प्रकरण कसेतरी संपलं. दिल्लीचा संघ हा सामना 15 धावांनी हरला. फेअरप्लेमध्ये दिल्लीचे गुण वजा करण्यात आले.
आयपीएलचा हा मोसम विराटसाठी फारसा चांगला नव्हता. त्याने 16 सामन्यात 342 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 115.98 होता. या मोसमात कोहली तीनदा शून्यावर बाद झाला. या मोसमातही त्याचे नाव वादात सापडले. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याला एलबीडब्ल्यू आऊट केल्यावर वाद झाला होता. त्याने 36 चेंडूत 48 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेविसला मैदानावरील पंच वीरेंद्र शर्मा यांनी आऊट दिले. विराटने लगेच रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचाने तो निर्णय बदलला नाही. चेंडू एकाच वेळी बॅटला आणि पॅडला लागल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. कोहलीला तिसऱ्या पंचाने आऊट दिले. या निर्णयानंतर विराट चांगलाच संतापलेला दिसला. त्याचा रागातील फोटो व्हायरल झाला. सोशल मीडियावर विराटच्या चाहत्यांनी अंपायरवर आपला राग काढला.
रियान पराग आणि हर्षल पटेल 26 एप्रिलला सीझनमध्ये दुसऱ्यांदा राजस्थान आणि आरसीबी आमनेसामने आले. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेल बाद झाला. 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 19.3 षटकात 115 धावांवर गारद झाला. कुलदीप सेनच्या चेंडूवर परागने हर्षल पटेलचा झेल घेतला. सामना जिंकल्यानंतर तो अधिक उत्साहात हर्षलशी भिडला. राजस्थान आणि आरसीबीच्या इतर खेळाडूंनी दोघांना वेगळे केले. हर्षलने रायनशी हस्तांदोलनही केले नाही.
कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात विचित्र वाद झाला. कोलकाताला विजयासाठी 153 धावांची गरज होती. रिंकू सिंग आणि नितीश राणा 19व्या षटकात फलंदाजी करत होते. प्रसिद्ध कृष्ण गोलंदाजी करायला आला. त्याने सलग तीन वाइड फेकले. रिंकू सिंगला वाईड बॉलवर कट शॉट मारायचा होता. यामुळे सॅमसनला राग आला. वाइडची पुष्टी करण्यासाठी त्याने रिव्ह्यू घेतला. मात्र, निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही.
चेन्नई सुपर किंग्जसाठी हा मोसम निराशाजनक होता. संघ नवव्या स्थानावर राहिला. महेंद्रसिंग धोनीने स्पर्धा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कर्णधारपद सोडले. ही जबाबदारी रवींद्र जडेजावर सोपवण्यात आली होती. आठ सामन्यांत सहा पराभव झाल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनी पुन्हा कर्णधार झाला. जडेजाही कर्णधारपदावरून गेल्यानंतर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. चेन्नई सुपर किंग्जने जडेजाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचंही मीडियामध्ये समोर आलं होतं. चेन्नई फ्रँचायझी सोशल मीडियावर ट्रोल झाली. जडेजा पुढील हंगामात चेन्नईकडून खेळणार नसल्याचा अंदाज क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.