Mumbai Indians IPL 2022: सचिन समोर Ishan Kishan ने दिली शिवी, त्यानंतर पुढे काय घडलं? ते इशानने सांगितलं

Mumbai Indians IPL 2022: आपल्या दमदार फलंदाजीने लाखो क्रिकेट चाहत्यांची मन जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या इशान किशनचा (Ishan Kishan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता.

Mumbai Indians IPL 2022: सचिन समोर Ishan Kishan ने दिली शिवी, त्यानंतर पुढे काय घडलं? ते इशानने सांगितलं
इशान किशन-सचिन तेंडुलकर Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 2:35 PM

मुंबई: आपल्या दमदार फलंदाजीने लाखो क्रिकेट चाहत्यांची मन जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या इशान किशनचा (Ishan Kishan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये इशान किशन सचिन समोर त्याचा गॉगल काढतो. कानातून इयरफोन काढून केस व्यवस्थित करतो आणि त्याला गुड आफ्टरनून करताना दिसला होता. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप भावला होता. पण या व्हिडिओ मागची गोष्ट तुम्हाला माहित आहे का?. इशानने एका मुलाखतीत त्या व्हिडिओमागची गोष्ट सांगितली आहे. इशान किशनने सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) माफी मागितली होती. पण असं काय झालं होत की, इशानला सचिनची माफी मागावी लागली होती. सचिनने इशान सोबत मस्करी केली होती. पण इशानला आपल्याच कृतीची लाज वाटली होती.

ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो मध्ये सांगितलं सत्य

ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो मध्ये इशान किशनने सचिनसोबत व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओचा किस्सा सांगितला आहे. इशान मुंबई इंडियन्सच्या एका खोलीत होता. त्यावेळी पटकन त्याने एक शिवी दिली होती. त्याला माहित नव्हत की, सचिन तिथे बसलाय. “मी मोहसीन आणि युद्धवीर सोबत रहायचो. माझ्याकडे जास्त सामान असल्यामुळे मी त्याच्याकडे मदत मागायचो. त्यादिवशी मी माझ्या फोनमध्ये गाणी सेट केली होती. पण अचानक ती गाणी मला फोनमध्ये मिळत नव्हती. मी रुममध्ये गेलो आणि त्यांना शिवी दिली”

सचिन समोर इशानने दिली शिवी

“मी शिवी दिल्यानंतर मोहसीन मला इशारा करत होता. मी बघितलं सचिन तिथे बसला होता. त्यानंतर मी माझ्या चष्मा आणि ईयरफोन काढून त्याला गुड आफ्टरनून म्हटलं” तो किस्सा इशानने सांगितला. “एकदिवस मी सचिनकडे त्याच टी-शर्ट मागितलं. त्यावर सचिनने मला विचारलं, तुला पाहिजे की, दुसऱ्या कोणाला?. मी म्हटलं पाजी मला पाहिजे. त्यावर सचिनने तुला कसं मी नाही बोलू शकतो, असं म्हटलं. मी लगेच सचिनची माफी मागितली” असं इशानने सांगितलं.

फ्रेंचायजीचा विश्वास सार्थ ठरवला

इशान किशन मुंबई इंडियन्सचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये इशानला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं. यंदाच्या मेगा ऑक्शनमधला तो सर्वात महागडा खेळाडू आहे. इशानने फ्रेंचायजीचा त्याच्यावरील विश्वासही सार्थ ठरवला आहे. त्याने सलग दोन सामन्यात दोन अर्धशतक झळकावली आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध इशानने नाबाद 81 आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध 54 धावांची खेळी केली.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.