RCB Captiancy: ‘विराट कर्णधार म्हणून अपयशीच’, 3 देशांच्या 4 दिग्गज क्रिकेटपटूंचे टीकास्त्र

आरसीबीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची यंदाची शेवटची आयपीएल होती. पण केकेआरने त्यांना पराभूत केल्याने विराटचं कर्णधार म्हणून स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. विराटच्या कर्णधारपदावरुन पायउताराच्या निर्णयानंतरही त्याच्यावरील टीका थांबत नसल्याचं समोर येत आहे.

| Updated on: Oct 13, 2021 | 7:42 PM
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधारपदाचा शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला. या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराट कोहलीने यापूर्वीच जाहीर केले होतं. दरम्यान केकेआरकडून पराभव पत्करावा लागल्याने आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान इथेच संपला असून आता विराट आरसीबीचा कर्णधार म्हणून कधीच खेळणार नाही

1 / 5
विराट कोहली सर्वात आधी आरसीबीचा माजी कर्णधार डॅनियल वेट्टोरी दुखापतग्रस्त झाल्यानंतर कर्णधार झाला होता. त्यानंतर 2013 मध्ये तो कायमस्वरुपी कर्णधार झाला. तेव्हापासून तब्बल 140 सामन्यात त्याने संघाचे नेतृत्त्व केले असून त्यातील 70 सामन्यात संघ पराभूत झाला असून 66 सामने जिंकले आहेत. तर 4 सामने हे अनिर्णीत सुटले आहेत.

2 / 5
दरम्यान विराटच्या या कामगिरीवर अजूनही टीकस्त्र सुरुच आहेत. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना विराटच्या कर्णधारपदाबाबत बातचीत केली. तो म्हणाला विराट मैदानात खूप ऊर्जा घेऊन खेळतो. पण स्पर्धा जिंकण्यासाठी केवळ उत्साह नाही तर योग्य रणनीती आवश्यक असते.

3 / 5
दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने ‘क्रिकबज’ शी बोलताना सांगितलं, ‘विराट एक कर्णधार म्हणून भारतीय संघ आणि आरसीबी या दोघांसाठी मर्यादीत ओव्हर्सच्या सामन्यात अधिक यश मिळवू शकला नाही. मागील काही काळात आरसीबी संघात उत्तम खेळाडू आले आहेत. यंदाही मॅक्सवेल, हर्षल पटेल यांनी अप्रतिम खेळ केला तरीही आरसीबी खिताबापासून दूर राहिली. त्यामुळे विराट स्वत:ला एक अपयशी कर्णधार मानेल’

4 / 5
याशिवाय माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरनेही विराटच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले असून तो म्हणाला फिटनेस आणि खेळाच्या बाबतीत अव्वल आहे. पण संघनिवडीमध्ये तो चुकतो. तर दुसरीकडे आरसीबीचा माजी कर्णधार डॅनियल वेट्टोरीलाही विराटची कर्णधारी नाही पटली.  विराटने फलंदाजाच्या निवडीत गडबड केल्याचं डॅनियलचं मत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.