घटस्फोटानंतर हार्दिक पांड्यासाठी आणखी एक वाईट बातमी, आता काय झालं?
भारतीय संघ आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी२० आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. आज बीसीसीआयने टीम इंडियाचा यासाठी घोषणा केलीये. श्रीलंकेविरुद्धच्या तीन T20 सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या नव्हे तर सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारतीय संघ श्रीलंका (IND vs SL) दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी तीन वनडे आणि तीन टी-२० सामने होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवला संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचे पत्ता कट झाला आहे. याआधी हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार होता. तर शुभमन गिल याला उपकर्णधार करण्यात आले आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला उपकर्णधार देखील करण्यात आलेलं नाही. अशा प्रकारे कोच गंभीर आणि बीसीसीआय निवड समितीने हार्दिक पांड्याला झटका दिला आहे.
हार्दिक पांड्याला कर्णधारपद मिळणार नाही असे संकेत आधीच येत होते. हार्दिकला त्याच्या फिटनेसमुळे हा धक्का बसला आहे. गौतम गंभीर कोच झाल्यानंतर टी२० वर्ल्डकप २०२६ साठी तयारी सुरु झाली आहे. आतापासूनच संघाची बांधणी केली जात आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी२० मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता नव्या खेळाडूंना या संघात स्थान दिलं जाणार आहे.
वनडे टीममध्ये हार्दिक पांड्याला संधी मिळालेली नाही. त्याचा समावेश फक्त टी२० सामन्यांसाठी करण्यात आली आहे. दुसरीकडे पंतला उपकर्णधार केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण त्याला देखील फक्त संघात स्थान मिळालं आहे. उपकर्णधार करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता प्रशिक्षक गौतम गंभीर याची भविष्यात आणखी काय योजना आहे. हे देखील समोर येईल.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: (India ODI Squad against Sri Lanka)
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ : (India T20I and Squad against Sri Lanka)
सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), जैस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.