Gautam gambhir: ‘विराट-रोहितसारखे भरपूर येतील, पण त्याच्यासारखा….’ अखेर गौतम गंभीरकडून कबुली
Gautam gambhir: गौतम गंभीरने अखेर मान्य केलं, की....
नवी दिल्ली: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय क्रिकेट टीमचा प्रवास संपुष्टात आलाय. टीम इंडियाने एडिलेडमध्ये इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल सामना 10 विकेटने गमावला. 16 व्या ओव्हरमध्येच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं. टीम इंडियाच्या या पराभवानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. गौतम गंभीरला आता एमएस धोनीची आठवण झालीय. भारताच्या पराभवानंतर गंभीरने एमएस धोनीबद्दल एक विधान केलं. प्रत्येकजण त्या विधानाशी सहमत आहे.
गौतम गंभीरच ते वक्तव्य काय?
“धोनीसारखं तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणं कुठल्या भारतीय कॅप्टनला जमणार असं वाटत नाही” असं गंभीर म्हणाला. “कदाचित कोणी रोहित शर्मापेक्षा जास्त डबल सेंच्युरी मारेल. विराट कोहलीपेक्षा जास्त सेंच्युरी झळकवेल. पण कुठल्या भारतीय कॅप्टनला धोनीसारखं आयसीसीची तीन विजेतेपद मिळवून देणं जमेल असं वाटत नाही” असं गौतम गंभीर म्हणाला.
धोनीच्या नावावर अद्भुत रेकॉर्ड
धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. टीम इंडियाने सर्वप्रथम 2007 साली टी 20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलं. त्यानंतर 2011साली वनडे वर्ल्ड कप आणि 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीशिवाय क्रिकेट विश्वातील कुठल्याही अन्य कॅप्टनला असा कारनामा करणं जमलेलं नाही.
धोनी नंतर विराट फेल
धोनीनंतर विराट कोहलीने टीम इंडियाच नेतृत्व संभाळलं. पण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. 2017 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली होती. पण पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर 2019 साली टीम इंडियाचा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला. 2021 मध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला. 2021 टी 20 वर्ल्ड कपच्या साखळीतच टीम इंडियाचा पराभव झाला.
विराट नंतर रोहितही अपयशी
त्यानंतर रोहित शर्माच्या हाती टीमच नेतृत्व आलं. रोहितने मागच्या वर्षभरात मेहनत केली. पण काल टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला.