‘या’ तीन खेळाडूंना RCB ने संघात कायम ठेवावं, बँगलोरच्या ‘त्रिमूर्ती’बद्दल गौतम गंभीरचं मोठं विधान

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Bangalore) संघ आयपीएलच्या इतिहासातील त्या संघांपैकी एक आहे ज्या संघाने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. हा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहचला पण एकदाही अंतिम फेरी जिंकू शकला नाही.

'या' तीन खेळाडूंना RCB ने संघात कायम ठेवावं, बँगलोरच्या 'त्रिमूर्ती'बद्दल गौतम गंभीरचं मोठं विधान
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 11:56 AM

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Bangalore) संघ आयपीएलच्या इतिहासातील त्या संघांपैकी एक आहे ज्या संघाने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. हा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहचला पण एकदाही अंतिम फेरी जिंकू शकला नाही. 2009 मध्ये, हा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला पण डेक्कन चार्जेसकडून पराभूत झाला. 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरीत या संघाचा पराभव केला. मग हा संघ 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहचला पण जेतेपद जिंकू शकला नाही. पुन्हा एकदा हा संघ हैदराबादकडून पराभूत झाला. 2013 पासून विराट कोहलीने या संघाचे कर्णधारपद भूषवले पण त्याला जेतेपद मिळवता आले नाही. IPL-2021 हा RCB मध्ये कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा हंगाम होता. एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा पराभव केला आणि या मोसमातील बँगलोरचा प्रवास संपवला. (Gautam Gambhir says RCB should retain Virat Kohli, Glenn Maxwell, Chahal or Harshal Patel)

पुढील वर्षी IPL चा मोठा लिलाव आहे. याआधी, आरसीबीसमोर मोठे आव्हान आहे की, त्यांची टीम कशी तयार करावी. उर्वरित संघांप्रमाणे, आरसीबी बदलाच्या टप्प्यातून जाईल कारण प्रत्येक फ्रँचायझीला फक्त तीन खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. कोलकात्याला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार गौतम गंभीरने आरसीबीने पुढील हंगामात कोणाला संघात कायम ठेवावे याबाबत सांगितले आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या एका कार्यक्रमात बोलताना गंभीरने सांगितले की. “आरसीबीने कोहली, मॅक्सवेल आणि युझवेंद्र चहल या तिघांना पुढील हंगामासाठी संघात कायम ठेवावे. गंभीर म्हणाला की, मला यात एक गोष्ट जोडायची आहे की, हर्षल पटेल आणि चहल यांच्यामध्ये एकाची निवड करता येईल. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संघात कायम ठेवायचे हे त्यांच्यावर अवलंबून आहे.”

डिव्हिलियर्सबद्दल गंभीर म्हणाला…

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला संघात कायम ठेवण्याच्या शक्यतेबद्दलही गंभीरने मत व्यक्त केले. या हंगामात या फलंदाजाने 15 सामन्यांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली पण यूएईत खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात जास्त यश मिळवू शकला नाही. आरसीबीने डिव्हिलियर्सला संघात कायम ठेवू नये का, असे विचारले असता तो म्हणाला, “होय, कारण मला वाटते की ते ग्लेन मॅक्सवेलला संघात कायम ठेवतील. कारण मॅक्सवेल संघाचं भविष्य आहे डिव्हिलियर्स नाही.”

कोहलीच्या घोषणेमुळे मोठा फरक पडला

गंभीरने म्हटले आहे की, विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय संघातील खेळाडूंसाठी चांगला नव्हता आणि यामुळे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यापासून त्यांचे लक्ष हटले. गंभीर म्हणाला की, आरसीबीने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत कोहली आपली घोषणा पुढे ढकलू शकला असता. स्पर्धेच्या शेवटी तो हे करू शकला असता. तो म्हणाला, “मला वाटते की, त्याला जर कर्णधारपद सोडायचे होते, तर तो स्पर्धेनंतर त्याची घोषणा करू शकला असता. जेव्हा त्याने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली, तेव्हा अशी परिस्थितीदेखील नव्हती की, हा संघ क्वालिफाय होणार नाही. मला वाटते की, त्याने स्पर्धा संपल्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला असता तर बरे झाले असते.”

इतर बातम्या

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

भारतीय संघाच्या T20 World Cup च्या वेळापत्रकात बदल, महत्त्वाच्या संघासोबतचा सामना रद्द!

(Gautam Gambhir says RCB should retain Virat Kohli, Glenn Maxwell, Chahal or Harshal Patel)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.