VIDEO: गौतम गंभीर जास्त दिवस प्रशिक्षकपदी टिकणार नाही, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य, दिली तीन कारणे

gautam gambhir head coach: मी गौतम गंभीरला चांगलेच ओळखतो. त्याचा स्वभाव पहिल्यास तो जास्त दिवस भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करु शकणार नाही. त्यासाठी तीन महत्वाची कारणे आहेत.

VIDEO: गौतम गंभीर जास्त दिवस प्रशिक्षकपदी टिकणार नाही, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य, दिली तीन कारणे
प्रशिक्षक गौतम गंभीर
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 9:36 AM

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची नियुक्ती झाली. श्रीलंका दौऱ्यापासून त्याने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतली. भारत-श्रीलंका दरम्यान झालेल्या T20 सीरीजमध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर याला पहिलेच यश मिळाले. भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप केले. त्यामुळे गौतम गंभीर याच्या कारकिर्दीची सुरुवात यशाने झाली. त्यावेळी वर्ल्डकप विजेता भारतीय संघातील खेळाडूंचे धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे. त्यानुसार, गौतम गंभीर जास्त दिवस प्रशिक्षक म्हणून राहू शकणार नाही. त्यासाठी त्या खेळाडूने तीन कारणेही दिली आहेत. 2007 मधील T20 वर्ल्डकप विजेता संघातील खेळाडू जोगिंदर शर्मा याने हे वक्तव्य केले आहे.

जोगिंदर शर्मा याने काय म्हटले

गौतम गंभीरसंदर्भात वक्तव्य करणारा खेळाडू 2007 मधील T20 वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य होता. विजय झालेल्या भारतीय संघातील हिरो होता. त्या वर्ल्डकपमध्ये गौतम गंभीर याचा सहकारी सदस्य होता. जोगिंदर शर्मा याच्या वक्तव्यानुसार, मी गौतम गंभीरला चांगलेच ओळखतो. त्याचा स्वभाव पहिल्यास तो जास्त दिवस भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करु शकणार नाही.

हे सुद्धा वाचा

जोगिंदर शर्मा याने दिली तीन कारणे

जोगिंदर शर्मा याची गौतम गंभीर संदर्भातील मुलाखत चांगलीच व्हायरल झाली आहे. त्या मुलाखतीत जोगिंदर शर्मा याने तीन कारणे दिली आहे.

  1. गौतम गंभीर याचे काही निर्णय असे असतात की ते अनेकांना आवडत नाही. कारण तो सरळ बोलतो, रोखठोक बोलतो.
  2. गौतम गंभीर कोणाजवळ जात नाही. त्याला चापलूसी करणे जमत नाही. त्याची तशी सवय नाही.
  3. गौतम गंभीर आपल्या कामाशी काम ठेवतो. तसेच कधी क्रेडीट घेण्याच्या फंद्यातही पडत नाही.

राहुल द्रवीड ऐवजी गौतम गंभीर

राहुल द्रविड याच्या जागी गौतम गंभीर याने टीम इंडियात स्थान मिळवले आहे. T20 विश्वचषक 2024 मधील विजयासह राहुल द्रविडचा टीम इंडियाचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. त्यानंतर गौतम गंभीरकडे ही जबाबदारी आली. सध्या भारतीय संघ गौतम गंभीर याच्या प्रशिक्षकपदाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिका सुरु आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.