Suryakumar Yadav : गंभीर कॅप्टन म्हणून चुकला, सूर्यकुमार यादवबद्दल गौतम गंभीरच मोठं वक्तव्य

Suryakumar Yadav : आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सची टीम दमदार प्रदर्शन करतेय. यामागे एक प्रमुख कारण म्हणून गौतम गंभीरकडे पाहिलं जातय. गौतम गंभीरमुळे केकेआरच्या टीममध्ये आज एक वेगळं चैतन्य दिसतय. त्याचवेळी गौतम गंभीरच्या मनात एका गोष्टीबद्दल प्रचंड खंत आहे.

Suryakumar Yadav : गंभीर कॅप्टन म्हणून चुकला, सूर्यकुमार यादवबद्दल गौतम गंभीरच मोठं वक्तव्य
mi suryakumar yadav ipl 2024,
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 1:47 PM

मेहनत, सातत्याच्या बळावर आज सूर्यकुमार यादवने स्वत:ची एक वेगळी ओळख बनवलीय. मागच्या दोन-चार वर्षात सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीच्या बळावर स्वत:ची एक दहशत निर्माण केलीय. सूर्यकुमार यादव आज मुंबई इंडियन्सच नाही, टीम इंडियाचा सुद्धा मधल्या फळीतील आधारस्तंभ बनलाय. सूर्यकुमार यादव आणि मुंबई इंडियन्सच एक अतूट नातं निर्माण झालय. मुंबई इंडियन्सची टीमच आज सूर्यकुमारची ओळख बनलीय. पण फार कमी जणांना माहित असेल, सूर्यकुमार यादव कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता. 2014 साली केकेआरने आयपीएलचे जेतेपद पटकावले, त्यावेळी सूर्यकुमार यादव केकेआरचा भाग होता. आज गौतम गंभीरला याच गोष्टीची खंत आहे. गौतम गंभीर त्यावेळी केकेआरचा कॅप्टन होता. सूर्यकुमार यादवच्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन घेता आला नाही, ही खंत गौतम गंभीरच्या मनात आहे.

सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्समधून पदार्पण केलं. त्याला मुंबईच्या टीमकडून रिलीज करण्याआधी फक्त एक मॅच खेळण्याची संधी मिळाली. केकेआरने त्यानंतर 2014 मध्ये सूर्यकुमारला विकत घेतलं. त्याचवर्षी केकेआरने ट्रॉफी जिंकली. त्यानंतर पुढच्या चार वर्षात लोअर ऑर्डरमध्ये खेळताना सूर्यकुमार यादवने 54 सामन्यात 608 धावा केल्या. आज गौतम गंभीरला याबद्दल खूप खंत वाटते. स्पोटर्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत त्याने मनातली भावना बोलून दाखवली.

गौतम गंभीरने काय बोलून दाखवलं?

सूर्यकुमार यादवची खरी क्षमता ओळखण्यात आणि त्याच्या बॅटिंगसाठी योग्य नंबर कोणता असावा? यामध्ये कमी पडल्याची कबुली गंभीरने दिली. “एक लीडर म्हणून तुम्हाला सर्वोत्तम क्षमता ओळखून ती जगासमोर सादर करता आली पाहिजे” असं गंभीर म्हणाला. “सात वर्षाच्या माझ्या कॅप्टन्सीमध्ये काही खंत असेल, तर ती सूर्यकुमार यादव. मी आणि टीम दोघेही सूर्यकुमार यादवच्या पूर्ण क्षमतेचा वापर करु शकलो नाही” असं गौतम गंभीर म्हणाला.

गौतम गंभीरला सूर्यकुमार यादवमध्ये काय भावलं?

“खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादवच्या समर्पण भावनेच कौतुक केलं. तो संघ भावनेने खेळणारा प्लेयर आहे. चांगला प्लेयर कोणीही बनू शकतो. पण सांघिक भावना ठेवून खेळण सोपं नसतं. त्याला तुम्ही 6-7 व्या नंबरवर खेळवा किंवा बेंचवर बसवा. त्याचा चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं. टीमसाठी खेळायला तो नेहमी तयार असायचा” असं गौतम गंभीर म्हणाला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.