गौतम गंभीरच्या ज्या निर्णयाची खिल्ली उडवली गेली त्याच निर्णयाने KKR ला बनवलं चॅम्पियन
गौतम गंभीरने त्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. यामुळे शाहरुख खानने देखील त्याच्या कपाळावर किस केले होते. गंभीरच्या ज्या निर्णयावर सगळ्यांनी खिल्ली उडवली. तोच निर्णय कसा योग्य होता हे गौतम गंभीरने सगळ्यांना दाखवून दिले. त्यामुळे त्याचे कोतूक होत आहे.
आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दणदणीत विजय मिळवला आहे. महत्त्वाचे म्हणजे या सामन्यात केकेआरने हैदराबादला जास्त रन बनवण्याची संधीच दिली नाही. केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आणि तिसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याआधी कोलकाता नाईट रायडर्सने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. यानंतर त्यांना बराच संघर्ष करावा लागला आणि तो २०२४ ला येऊन संपला. कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यावेळी गौतम गंभीरला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. गौतम गंभीरच्या एका निर्णयाची खिल्ली उडवली जात होती तोच निर्णय अखेर त्यांच्यासाठी चॅम्पियन बनवणारा ठरला.
तिसऱ्यांदा चॅम्पियन झाल्यानंतर गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गंभीर हसताना दिसतोय. हा व्हिडिओ आयपीएल लिलावाच्या दरम्यानचा आहे, जेव्हा गौतम गंभीर मिशेल स्टार्कला 24.75 कोटींना खरेदी केले होते. कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटींना विकत घेतल्यानंतर केकेआरच्या या निर्णयाची अनेकांनी खिल्ली उडवली सुरुवातीच्या सामन्यांमध्ये स्टार्क काही मोठी कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे गौतम गंभीरचा निर्णय चुकला असे अनेकांना वाटत होते. पण गंभीरला त्याने घेतलेल्या निर्णय़ाची जाणीव शेवटपर्यंत होती. त्याच्या या निर्णयाने त्याने संघाला विजेतेपद पटकावून दिले.
आठ वर्षांनंतर आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कने आगमन केले होते. पहिल्या नऊ सामन्यांमध्ये त्याला फक्त सात विकेट्स घेता आल्या. वानखेडेवर झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आपली प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो थांबलाच नाही. त्याने प्लेऑफ आणि अंतिम फेरीत आपल्या गोलंदाजीने संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या अभिषेक शर्माला मिचेल स्टार्कने आऊट केले. त्यामुळे त्याला बॉल ऑफ द टूर्नामेंट देखील म्हटले जात आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये मिचेल स्टार्कने अभिषेकला आपला बळी बनवले होते. याशिवाय मिचेल स्टार्कने राहुल त्रिपाठीची विकेट घेतली. आयपीएलने शेवटच्या टप्प्यात प्रवेश करताच मिचेल स्टार्क फॉर्ममध्ये आला.
मिचेल स्टार्कने फायनलमध्ये तीन ओव्हरमध्ये फक्त १४ धावा दिल्या आणि दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. यामुळे मिचेल स्टार्क हा सामनावीर देखील ठरला. स्टार्कने पहिल्या क्वालिफायर सामन्यात चार ओव्हरमध्ये फक्त 34 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या क्वालिफायरमध्येही तो सामनावीर ठरला.