विराट कोहलीच्या 50 व्या शतकावर गौतम गंभीरची मन जिंकणारी प्रतिक्रिया
gambhir on virat kohli : गौतम गंभीरने विराट कोहलीच्या शतकीय खेळीचे कौतूक केले आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहित आहे. पण तरी देखील गौतम गंभीरने केलेल्या पोस्टचं सर्वत्र कौतूक होत आहे.
Gautam Gambhir on Kohli : वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 117 धावांची दमदार खेळी खेळली. या शतकीय खेळीनंतर त्याने वनडे क्रिकेटमध्ये त्याचे 50 वे शतक पूर्ण केले. यासोबतच त्याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ही मोडला. यावेळी सचिन तेंडुलकर देखील प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होता. शतक पूर्ण झाल्यानंतर विराटने तेंडुलकरला आदर दिला. 50 शतक करणाऱ्या विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. सगळ्याच स्तरातून त्याचं कौतूक होतंय. त्यावर भारताचा माजी खेळाडू आणि खासदार गौतम गंभीरने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
गौतम गंभीरकडून कोहलीचे कौतूक
गौतम गंभीरने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. ५० शतके करुन महान सचिन तेंडुलकरला मागे टाकत एका स्मरणीय कामगिरीबद्दल विराटचे अभिनंदन!! मला खात्री आहे की त्याच्या दिवंगत वडिलांना आज खूप अभिमान वाटत असेल आणि ते वरून आपल्या मुलाकडे पाहून हसत असतील!!
Congratulations to @imVkohli on a monumental achievement going surpass the great @sachin_rt by scoring 50 tons’!! I’m sure his late father must be very proud today and smiling from the clouds above looking at his son ❤️!! By far greatest of this generation . #IndiaVsNewZealand pic.twitter.com/St6vzxVeru
— Gautam Gambhir (@Gaotum_Gambhir) November 15, 2023
चाहत्यांकडून गंभीरच्या पोस्टला पसंती
गौतम गंभीरने दिलेल्या प्रतिक्रियेवर चाहत्यांची देखील पसंती मिळत आहे. कोहलीने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिले वनडे शतक झळकावले होते. तेव्हा गौतम गंभीरनेही त्या सामन्यात शतक झळकावले होते. गौतम गंभीरला ऑफिशियल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला होता तेव्हा गंभीरने हा पुरस्कार विराट कोहलीला दिला होता. त्यावेळेस गौतम गंभीर म्हणाला होता की, विराटचे हे पहिले शतक आहे. मला त्याचे हे शतक आणखी खास बनवायचे होते.
आयपीएलमध्ये भिडले होते गंभीर-कोहली
आयपीएल सामन्या दरम्यान विराट आणि गंभीर एकमेकांना भिडले होते. यानंतर क्रिकेटच्या मैदानाबाहेर आमच्यात वैयक्तिक भांडण नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
19 नोव्हेंबरला फायनल
भारतीय संघ आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये फायनल सामना खेळणार आहे. भारतीय संघ तिसर्यांदा विश्वचषकाचे जेतेपद पटकावणार का याकडे जगाचं लक्ष लागून आहे. भारताने 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकला आहे.