जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आहे. आज हा सामना निकाली निघेल. पण सध्या पावसाने खेळामध्ये व्यत्यय आणला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद 118 धावा झाल्या असून त्यांना विजयासाठी 122 धावांची आवश्यकता आहे. सध्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकला, तर मालिकेत 2-0 विजयी आघाडी होईल. (Gavaskar urges Team India to win Johannesburg Test for ‘India’s greatest cricketer’)
भारताने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं इतकं सोप नाहीय. कारण भारताकडे आजच्या घडीचे बेस्ट वर्ल्ड क्लास बॉलर्स आहेत. ते दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान निर्माण करु शकतात. सध्या सामन्याच पारडं दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेलं आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी देशाच्या आणखी महान क्रिकेटपटूसाठी जोहान्सबर्ग कसोटी जिंका अशी विनंती केली आहे.
कधीही मालिका विजय मिळवलेला नाही
“भारताने दक्षिण आफ्रिकेत कधीही मालिका विजय मिळवलेला नाही. फार कमी कसोटी सामने जिंकले आहेत. 2018 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताने वनडे मालिका जिंकली पण कसोटी मालिका 2-1 ने गमावली होती. त्यामुळे आजचा विजय भारतासाठी खूप मोठा असेल” असे गावस्कर म्हणाले.
356 international matches ?
9,031 international runs ?
687 international wickets ☝️Here’s wishing @therealkapildev – #TeamIndia‘s 1983 World Cup-winning captain & one of the best all-rounders to have ever played the game – a very happy birthday. ? ? pic.twitter.com/Po4wYtvByl
— BCCI (@BCCI) January 6, 2022
हे कपिलसाठी सुंदर गिफ्ट असेल
“आज कपिल देव यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे या भारतीय संघाने मिळवलेला विजय हे कपिलसाठी सुंदर गिफ्ट असेल. या संघात कपिलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कपिलसाठी हे मोठे गिफ्ट असेल” असे गावस्कर म्हणाले. कपिल देव हे भारताच्या पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार आहेत. आज त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षात पदार्पण केलं.
संबंधित बातम्या:
IND vs SA 2nd Test: अखेरच्या दिवशी टीम इंडिया जिंकणार, चेतेश्वर पुजाराने सांगितली रणनीती
IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये पावसामुळे कुठल्या संघाला होईल फायदा?
ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी भारताची कॅप्टन मिताली राजबद्दल काही खास गोष्टी
(Gavaskar urges Team India to win Johannesburg Test for ‘India’s greatest cricketer’)