IPL 2022 : विराट कोहलीच्या जागी हा खेळाडू होणार आरसीबी टीमचा नवा कॅप्टन
आरसीबीकडून कर्णधारपदासाठी ग्लेन मॅक्सवेलच्या नावाची चर्चा आहे. आरसीबी ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार बनवू शकते अशी शक्यता डॅनियल व्हिटोरीने वर्तवली आहे. ग्लेन मॅक्सवेलकडे मेलबर्न स्टारच्या कर्णधारपदाचा अनुभवही आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएलसाठी आरसीबीने तीन खेळाडू रिटेन केले आहे. त्यातील एका कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते. विराट कोहलीने आरसीबीचं कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे या सीझनमध्ये आरसीबी नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. या कर्णदाधाराच्या नेतृत्वात आरसीबीला पहिलं विजेतेपद मिळणार का? हे सीझन सुरू झाल्यानंतरच कळेल. रथी महारथींचा भरणा असलेल्या आरसीबीला आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही विजेतेपद जिंकता आलं नाही. रिटेन केलेल्या खेळाडुंमध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
ग्लेन मॅक्सवेल आरसीबीचा नवा कर्णधार?
आरसीबीकडून कर्णधारपदासाठी ग्लेन मॅक्सवेलच्या नावाची चर्चा आहे. आरसीबी ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार बनवू शकते अशी शक्यता डॅनियल व्हिटोरीने वर्तवली आहे. ग्लेन मॅक्सवेलकडे मेलबर्न स्टारच्या कर्णधारपदाचा अनुभवही आहे. त्याला एका सीझनसाठी का होईना कर्णधारपद मिळू शकते, त्याच्या नेतृत्वात टीम कशी चालते? याची चाचपणी केली जाऊ शकते. शिवाय मॅक्सवेलचा मागच्या सीझनमधील खेळही शानदार राहिला आहे. बिग हिटर अशी ओळख असलेला मॅक्सवेल स्पिन बॉलिंगही चांगली करतो. त्याचाही टीमला फायदा निश्चित होणार आहे. शिवाय मॅक्सवेलने आयपीएलमध्ये पंजाब टीमसाठी कर्णधारपद संभाळले आहे. त्याने 62 सामन्यात 34 वेळा मलबर्न स्टारला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्याला ही जबाबदारी देण्याची शक्यता आहे. मॅक्सवेलला 11 कोटी रुपये देऊन आरसीबीने रिटेन केलं आहे. त्याच्या मागील सीझनमधील चमकदार खेळीमुळे टीम प्लेऑफपर्यंत पोहोचली होती.
आरसीबीला पहिल्या विजेतेपदाचे वेध
मॅक्सवेलला याच कारणासाठी आरसीबीने रिटेन केलं आहे, अशा चर्चा सध्या क्रिकेट विश्वात सुरू आहेत. शिवाय आरसीबीकडे सध्या मॅक्सवेलच्या तोलामोलाचा पर्यायही दिसून येत नाही. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात संघाला पहिल्या विजेतेपदाची आशा असणार आहे. त्यामुळे मॅक्सवेलबरोबरच आरसीबीचे नशिब बदलेल का? याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत.