IPL 2021 पूर्वीच दिग्गज क्रिकेटर्सचा टी-20 धमाका, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी
श्रीलंकेच्या लंका प्रिमियर लीगला लवकरच सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये बरेच दिग्गज क्रिकेटपटू खेळत असल्याने क्रिकेट रसिकांना IPL 2021 पूर्वीच षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे.
कोलंबो : कोरोनाच्या संकटामुळे यंदाची इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) मधूनच स्थगित करण्यात आली होती. मात्र लवकरच आयपीएलचे उर्वरीत सामने युएईला (UAE) होणार असल्याचं बीसीसीआयने (BCCI) घोषित केले. त्यामुळे सर्वच क्रिकेटपटू आयपीएलची आतुरतने वाट पाहत आहे. मात्र आयपीएलआधीच टी-20 क्रिकेटचा थरार रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. श्रीलंकेची लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) 30 जुलैपासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लीगमध्ये क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू भाग घेत असल्याने ही क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. (Good News For Cricket Lovers Lanka Premier League Will Start From 30 july Before IPL)
लंका प्रीमियर लीगचा यंदाचा हा दुसरा सीजन आहे. 30 जुलैला सुरु होणारी ही स्पर्धा 22 ऑगस्टपर्यंत खेळवली जाईल. श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापन कमिटीचे चेअरमन अर्जून डिसिल्वा यांनी याबाबतची माहिती दिली. सध्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापन अंतिम टप्प्यात असून मागील वर्षी सामने हे हंबनटोटा स्टेडियममध्ये खेळवले गेले होते. त्यावेळी पाच संघानी स्पर्धेत भाग घेतला होता.
मागील वर्षी जाफना स्टॅलियन्स विजयी
लंका प्रीमियर लीगचा 2020 साली पहिलाच सीजन खेळवण्यात आला. 26 नोव्हेंबर 2020 रोजी स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. त्यानंतर 16 डिसेंबर, 2020 रोजी अंतिम मॅच झाली होती. थिसारा परेरा कर्णधार असलेल्या जाफना स्टॅलियन्स आणि भानुका राजपक्ष कर्णधार असणाऱ्या गॉल ग्लेडिएटर्स यांच्यात फायनल रंगली होती. सामन्यांत जाफना स्टॅलियन्सने 6 विकेट्सच्या बदल्यात 188 धावा केल्या होत्या. शोएब मलिकने 35 बॉलमध्ये 46 धावा केल्या होत्या. त्यानंतर गॉल ग्लेडिएटर्सचा संघ 9 विकेट्च्या बदल्यात केवळ 135 धावाच करु शकला. शोएब मलिकने गोलंदाजीतही अप्रतिम प्रदर्शन दाखवत 13 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामुळे जाफना स्टॅलियन्स 53 धावांनी सामना जिंकला.
हे ही वाचा :
IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय
भारतीय दिग्गजाच्या 18 चेंडूत 88 धावा, मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस, रिषभ पंतशी सातत्याने तुलना
(Good News For Cricket Lovers Lanka Premier League Will Start From 30 july Before IPL)