IND vs SL: टीम इंडियासाठी Good News, वनडे सीरीजासठी प्रमुख खेळाडूच टीममध्ये पुनरागमन
IND vs SL: 'या' खेळाडूच्या समावेशामुळे टीम इंडियाची ताकत आणखी वाढणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.
मुंबई: आजपासून श्रीलंकेविरुद्ध टी 20 सामन्याची सीरीज सुरु होत असतानाच, टीम इंडियासाठी एक गुड न्यूज आहे. नववर्षात टीम इंडियाला एक चांगली बातमी मिळालीय. यामुळे टीम इंडियाची ताकत वाढणार आहे. या बातमीमुळे टीम इंडियाला नक्कीच दिलासा मिळेल. टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला फिट घोषित करण्यात आलं आहे.
मागच्या सहा महिन्यांपासून टीम बाहेर
मागच्या सहा महिन्यांपासून जसप्रीत बुमहार टीमबाहेर होता. पाठिच्या दुखण्यामुळे या सहा महिन्यात तो फक्त दोन सामने खेळू शकला. जसप्रीत बुमराहाला आता फिट घोषित करण्यात आलय. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या सीरीजसाठी त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
कधीपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता?
श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्याच्या सीरीजसाठी जसप्रीत बुमराहचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयने स्टेटमेंटद्वारे ही माहिती दिली. बुमराह सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. पाठीच्या दुखण्यामुळेच तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नाही. जसप्रीत बुमराह रिहॅबच्या प्रोसेसमध्ये होता. त्याला NCA ने फिट म्हणून घोषित केलय. तो लवकरच टीम इंडियाच्या वनडे टीममध्ये दाखल होईल. कधी सुरु होणार वनडे सीरीज?
3 वनडे सामन्यांची सीरीज 10 ते 15 जानेवारी दरम्यान खेळली जाईल. आजपासून श्रीलंकेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरीज सुरु होईल. 3 जानेवारीला म्हणजे आज पहिला सामना होणार आहे.
पाठदुखीचा त्रास कधी सुरु झाला?
बुमराहने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 2 महिन्यानंतर मैदानात पुनरागमन केलं होतं. फक्त दोन सामने खेळल्यानंतर त्याची दुखापत बळावली. त्यावेळी त्याला फिट घोषित करण्यात आलं होतं. पण 2 सामन्यानंतर दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं. 3 वर्षात 5 वेळा जसप्रीत बुमराहला दुखापत झालीय. मागच्यावर्षी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असताना जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा त्रास सुरु झाला होता.