IND vs PAK: ‘काफी सुंदर रिप्लाय’, गुगलच्या CEO कडून पाकिस्तानी चाहत्याची बोलती बंद, टि्वट व्हायरल

IND vs PAK: सुंदर पिचाईना ट्रोल करण्याच्या नादात पाकिस्तानी चाहता पडला तोंडघशी

IND vs PAK: 'काफी सुंदर रिप्लाय', गुगलच्या CEO कडून पाकिस्तानी चाहत्याची बोलती  बंद, टि्वट व्हायरल
sundar-pichaiImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 12:24 PM

वॉशिंग्टन: टीम इंडियाने काल पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला. अक्षरक्ष: हरलेला सामना विराट कोहलीने खेचून आणला. शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये विजय मिळवला. खऱ्याअर्थाने जगभरातील तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा थरार अनुभवता आला. या विजयाचे सोशल मीडियावरही पडसाद उमटत आहेत. सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

‘ते’ टि्वट पाकिस्तानी चाहत्याला पचलं नाही

अगदी गुगल कंपनीचे सीईओ सुद्धा याला अपवाद नाहीत. सुंदर पिचाई यांना क्रिकेटची आवड आहे. सुंदर पिचाई यांनी, आज जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना टीम इंडियाच कौतुक केलं. पिचाई यांनी केलेलं हे टि्वट पाकिस्तानी चाहत्याला पचवता आलं नाही. त्याने सुंदर पिचाई यांना रिप्लाय केला. त्यावर सुंदर पिचाई यांनी दिलेल्या उत्तराने त्या पाकिस्तानी चाहत्याची बोलती बंद झाली.

सुंदर पिचाई टि्वटमध्ये काय म्हणाले?

सर्वांना हॅप्पी दिवाळी ! तुम्ही सर्व तुमचे कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत दिवाळी आनंदात साजरी करत असाल. आज पुन्हा एकदा मी शेवटची तीन षटक पाहून दिवाळी साजरी केली. टीम इंडियाने काय कामगिरी केली, अप्रतिम असं सुंदर पिचाई यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.

ट्रोलिंगचा प्रयत्न त्यावर पाकिस्तानच्या समर्थकाने सुंदर पिचाई यांनी सुरुवीच्या तीन ओव्हर बघायला पाहिजे होत्या, असा रिप्लाय दिला. भारताच्या डावात पहिल्या तीन ओव्हर्समध्ये टीम इंडियाने झटपट विकेट गमावल्या होत्या. त्याने सुंदर पिचाई यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय चाहत्यांकडून पाकिस्तानची फिरकी

त्यावर सुंदर पिचाई यांनी त्या पाकिस्तानी चाहत्याला ‘हो बघितल्या, भुवी आणि अर्शदीपने काय स्पेल टाकला’ असं भन्नाट उत्तर दिलं. सुंदर पिचाई यांचे हे टि्वट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यात येत असून भारतीय चाहते पाकिस्तानची फिरकी घेत आहे.

पाकिस्तानने काल पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 159 धावा केल्या. टीम इंडियाने 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठलं. विराट कोहली टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने नाबाद 82 धावा फटकावल्या. दुसऱ्याबाजूने हार्दिक पंड्याने 37 धावा काढून त्याला साथ दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.