IPL 2023 : ‘ते’ शेवटचे 2 चेंडू टाकण्याआधी हार्दिक बरोबर काय बोलणं झालं, अखेर Mohit Sharma चा खुलासा, VIDEO

IPL 2023 : 'मी माझ्या बाजूने सर्वोत्तम प्रयत्न केले असं Mohit Sharma ने सांगितलं. त्या' शेवटच्या 2 चेंडूंमुळेच चेन्नई सुपर किंग्सची टीम पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली. रवींद्र जाडेजा विजयाचा नायक ठरला.

IPL 2023 : 'ते' शेवटचे 2 चेंडू टाकण्याआधी हार्दिक बरोबर काय बोलणं झालं, अखेर Mohit Sharma चा खुलासा, VIDEO
IPL 2023 Image Credit source: AP
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 12:38 PM

अहमदाबाद : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे सोमवारी रात्री पुन्हा एकदा स्पष्ट झालं. क्रिकेटच्या खेळात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं. IPL 2023 च्या फायनलच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं. चेन्नई सुपर किंग्सला लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज होती. मोहित शर्मा ही ओव्हर टाकत होता. ह्दयाची धडधड वाढवणाऱ्या त्या क्षणांच्यावेळी एखादा अनुभवी आणि मानसिक दृष्टया कणखर असलेला गोलंदाजच हवा. अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्यावेळी 80 हजारपेक्षा जास्त प्रेक्षक होते. सर्वांच्या मनातील धाकधूक वाढली होती.

गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याने आपला सर्वात विश्वासू गोलंदाज आणि फॉर्ममध्ये असलेल्या मोहित शर्मासाठी लास्ट ओव्हर राखून ठेवली होती. हरयाणाच्या या गोलंदाजाकडे अशा प्रसंगात गोलंदाजी करण्याचा अनुभव होता.

मोहित शर्मा काय म्हणाला?

लास्ट ओव्हरमध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 13 धावांची गरज होती. मोहित शर्माने ती ओव्हर टाकताना त्याच्या मनात काय चाललेलं, त्या बद्दल आता खुलासा केलाय. “मला काय करायचय, याबद्दल माझे विचार स्पष्ट होते. नेट्समध्ये मी अशा परिस्थितीसाठी तयारी केली होती. मी सर्व यॉर्कर चेंडू टाकायच ठरवलं होतं” असं मोहित शर्माने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. मोहित शर्माने ठरवलं होतं, तसे पहिले चार चेंडू टाकले. त्यावर सीएसकेला फक्त 3 धावा मिळाल्या. एक त्यात निर्धाव चेंडू होता.

हार्दिक बरोबर काय बोलण झालं, त्यावर मोहितचा खुलासा

CSK चा शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा क्रीजवर होते. “मोहितने पहिले चार चेंडू जबरदस्त टाकले, आम्हाला फार काही करता आलं नाही. आम्ही प्रयत्न केले. पण मोहित शर्माला त्याचं श्रेय जातं” असं शिवम दुबे म्हणाला. सीएसकेला 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पांड्या मोहित शर्मा बरोबर काहीतरी बोलला. त्याबद्दल आता मोहितने खुलासा केलाय.

‘लोक आता त्यावरुन बरच काही बोलतायत’

मोहित शेवटचे दोन चेंडू कसे टाकणार? हे गुजरातच्या टीमला जाणून घ्यायच होतं. “मी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करीन असं सांगितलं. लोक आता त्यावरुन बरच काही बोलतायत. पण खरं सांगायच झाल्यास त्याला अर्थ नाही. काय करायचय हे मला ठाऊक होतं” असं मोहित शर्मा म्हणाला.

लास्ट बॉल टाकण्याआधी मोहितच्या मनात काय होतं?

2 चेंडूत 10 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजाने मोहित शर्माच्या 5 व्या चेंडूवर सिक्स मारला. त्यावेळी सुद्धा शेवटचा चेंडू व्य़वस्थित टाकू असा मोहित शर्माला विश्वास होता. लास्ट बॉलवर मोहितने परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. पण “चेंडू जिथे जायला नको, तिथेच पडला, मी माझ्या बाजूने सर्वोत्तम प्रयत्न केले” असं मोहित म्हणाला. रवींद्र जाडेजाने मोहितच्या या चेंडूवर चौकार वसूल करुन चेन्नई सुपर किंग्सला पाचव विजेतेपद मिळवून दिलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.