Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs CSK : मुंबईकर मराठमोळ्या Impact Player चा आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात फ्लॉप शो

GT vs CSK IPL2023 : Impact Player च्या नियमाची प्रथमच आयपीएलमध्ये अमलबजावणी करण्यात आली. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही टीम्सनी आपले इम्पॅक्ट प्लेयर वापरले.

GT vs CSK : मुंबईकर मराठमोळ्या Impact Player चा आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात फ्लॉप शो
cskImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 8:25 AM

GT vs CSK IPL2023 : आयपीएल 2023 ची शानदार सुरुवात झाली आहे. लीगच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सने चारवेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला हरवलं. या सामन्यात गुजरात आणि चेन्नईमध्ये चांगली लढत पहायला मिळाली. पहिल्या सामन्यासह आयपीएलमध्ये नव्या नियमांची अमलबजावणी सुद्धा झाली. आयपीएल 2023 मध्ये काही नवीन नियम आलेत. यात इम्पॅक्ट प्लेयरचा एक नियम आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा पहिल्याच सामन्यात दोन्ही टीम्सनी वापर केला. पण दोन्ही टीम्सचे इम्पॅक्ट प्लेयर प्रभाव पाडू शकले नाहीत.

चेन्नईने अंबाती रायुडूच्या जागी वेगवान गोलंदाज तृषार देशपांडेची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड केली. तेच गुजरात टायटन्सने केन विलियमसनच्या जागी साई सुदर्शनची निवड केली. केन विलियमसनला फिल्डिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला रिप्लेस केलं. दोन्ही इम्पॅक्ट प्लेयरची सामन्यातील कामगिरी जाणून घेऊया.

गुजरातचा इम्पॅक्ट प्लेयर साई सुदर्शनचा परफॉर्मन्स कसा होता?

साई सुदर्शन स्पिन गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची फलंदाजी सुद्धा चांगली आहे. या सामन्यात त्याला फक्त बॅटिंगची संधी मिळाली. पण तो फार काही करु शकला नाही. त्याने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार मारला. पण तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. आपला पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने त्याला 10 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. सुदर्शनने 17 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 22 धावा केल्या.

GT vs CSK IPL2023 : ‘त्या’ 2 चेंडूंमुळे वैतागला धोनी, CSK च्या पराभवानंतर व्यक्त केलं दु:ख

तृषार देशपांडे फेल

चेन्नईने दुसऱ्या इनिंगमध्ये आपली गोलंदाजी बळकट करण्यासाठी तृषार देशपांडेची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड केली. पण तो ही प्रभावी कामगिरी करु शकला नाही. त्याने शुभमन गिलच्या रुपात चेन्नईला एक मोठी विकेट मिळवून दिली. देशपांडेच्या चेंडूवर गिलने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. पण ऋतुराज गायकवाने कॅच पकडली. हा विकेट टीमसाठी खूप महत्वाचा होता. देशपांडेला लास्ट ओव्हरमध्ये 8 धावांचा बचाव करता आला नाही. अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातला विजयापासून रोखण्यासाठी चेन्नईला 8 धावांचा बचाव करणं आवश्यक होतं. धोनीने आपल्या इम्पॅक्ट प्लेयरवर विश्वास दाखवला. पण दोन चेंडूत मॅच संपली. राहुल तेवतियाने लास्ट ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारुन मॅच संपवली. तृषार देशपांडेने 3.2 ओव्हरमध्ये 51 धावा देऊन एक विकेट काढली.

३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.