GT vs CSK IPL 2023 : गुजरातची टीम जिंकली पण त्यांच्यासाठी एक वाईट बातमी

GT vs CSK IPL 2023 : अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं. गुजरात टायटन्सने सलामीचा सामना आरामात जिंकला. पण यापुढच्या सामन्यांमध्ये त्यांच्यासमोर आव्हान असेल.

GT vs CSK IPL 2023 : गुजरातची टीम जिंकली पण त्यांच्यासाठी एक वाईट बातमी
Gujarat titansImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 11:17 AM

GT vs CSK IPL 2023 : गुजरात टायटन्सने नव्या सीजनची शानदार सुरुवात केली आहे. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना झाला. गुजरात टायटन्सने एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट राखून विजय मिळवला. गुजरात टायटन्सच्या टीमला हा सामना जिंकण्यात फार अडचणी आल्या नाहीत. पण यापुढच्या सामन्यांसाठी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आधीच डेविड मिलर नसल्यामुळे त्यांची फलंदाजीची बाजू थोडी कमकुवत झालीय.

त्यात गुजरातच्या टीमला आणखी एक झटका बसला आहे. गुजरात टायटन्सला लगेच या समस्येवर तोडगा शोधावा लागला. कारण त्यांच्या एका मोठ्या प्लेयरला दुखापत झाली आहे.

हवेत उडी घेत चेंडू थांबवण्याचा प्रयत्न

काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने मारलेला फटका अडवताना केन विलियमनसनला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला मैदान सोडावं लागलं. 13 व्या ओव्हरमध्ये जोशवा लिटलच्या गोलंदाजीवर ऋतुराजने मोठा फटका खेळला. बॉल सिक्स जाणार असच सर्वांना वाटलं होतं मात्र सीमारेषेवर फिल्डिंग करत असलेल्या केन विलियमनसन याने हवेत उडी घेत चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याला दुखापत झाली.

पुढचा सामना इम्पॅक्ट प्लेयर खेळला

ज्यावेळी तो खाली पडला तेव्हाच त्याने आपला गुडघा पकडला. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला दोन खेळाडूंच्या मदतीने बाहेर यावं लागलं. दुखापतीमुळे विलियमसनच्या जागी साई सुदर्शन इम्पॅक्ट प्लेयर म्हणून पुढचा सर्व सामना खेळला.

कोच गॅरी स्टीड काय म्हणाले?

केनची दुखापत पाहून तो पुढचे काही सामने खेळणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर ती भीती खरी ठरलीय. केन विलियमसन पुढच्या काही सामन्यात खेळू शकणार नाहीय. कोच गॅरी स्टीड यांनी विलियमसनशी झालेल्या संवादानंतर ही माहिती दिली. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. लवकर चांगला होईल, अशी अपेक्षा

“दुखापत कितपत गंभीर आहे, ते अजून स्पष्ट नाहीय. पुढचे 24 ते 48 तास त्याला देखरेखीखाली ठेवलं जाईल. त्यानंतर काय ते समजेल” असं स्टीड म्हणाले. “दुखापत होणं चांगलं नाहीय. पण फिजियो पाहतायत. तो लवकर चांगला होईल, अशी अपेक्षा आहे” असं गुजरातचे कोच गॅरी कर्स्टन स्टार स्पोटर्सवर म्हणाले.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.