GT vs LSG IPL 2023 : लखनौला जिंकायच असेल, तर हार्दिकच्या टीममधील ‘या’ 6 प्लेयर्सना रोखावच लागेल

GT vs LSG IPL 2023 : लखनौच्या 'या' 4 प्लेयर्सपासून गुजरातला संभाळून रहाण्याची गरज आहे. आजचा सामना दोन्ही टीम्ससाठी का महत्वाचा आहे? ते जाणून घ्या. गुजरातचे हे 6 प्लेयर मॅचविनर आहेत. लखनौवर पडू शकतात भारी.

GT vs LSG IPL 2023 : लखनौला जिंकायच असेल, तर हार्दिकच्या टीममधील 'या' 6 प्लेयर्सना रोखावच लागेल
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 12:38 PM

अहमदाबाद : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामन्याचा दिवस आहे. आजचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन टीममध्ये होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. आयपीएल 2023 च्या पॉइंट्स टेबलवर नजर मारली, तर गुजरात टायटन्स पहिल्या आणि लखनौ तिसऱ्या स्थानावर आहे. चालू सीजनमध्ये दोन्ही टीम्सनी चांगलं प्रदर्शन केलय. दोन्ही तुल्यबळ टीम असल्याने आजचा सामना रोमांचक होईल अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे.

मागच्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सचा चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. गुजरात प्लेऑफमधील आपलं स्थान पक्क करण्यासाठी तर लखनौ पॉइंट्स टेबलवर अजून वर जाण्यासाठी जिंकण्याचा प्रयत्न करतील.

लखनौला जिंकायच असेल, तर या 6 जणांना रोखा

दोन्ही टीम्स आयपीएलमधील 51 वा सामना खेळणार आहेत. गुजरातकडून आजच्या सामन्यात ओपनर शुभमन गिल, कॅप्टन हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया आणि राशिद खान हे महत्वाचे खेळाडू आहेत. हे सर्व मॅचविनर आहेत. त्यात मिलर, तेवतिया आणि राशिद हे उत्तम फिनिशर आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमच्या मनात त्यांचा एक धाक आहे.

हार्दिक बॅट आणि बॉल दोघाने कमाल दाखवू शकतो. विजय शंकरने सुद्धा या सीजनमध्ये आपल्या बॅटची ताकत दाखवून दिलीय. शुभमन गिल ओपनिंगला आल्यानंतर दमदार स्टार्ट देतो. त्यामुळे लखनौला जिंकायच असेल, तर या 6 जणांना रोखावं लागेल.

लखनौचे हे चार प्लेयर सर्वात जास्त घातक

दुसऱ्याबाजूला लखनौ सुपर जायंट्स आपला नियमित कॅप्टन केएल राहुलशिवाय खेळणार आहे. क्रृणाल पंड्याकडे आता या टीमच नेतृत्व आहे. दुखापतीमुळे केएल राहुल आयपीएलमधून बाहेर गेलाय. लखनौच्या टीममध्ये काइल मेयर्स, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन हे महत्वाचे खेळाडू आहेत. चालू सीजनमध्ये हे चौघेही कमालीचे फॉर्ममध्ये आहेत. अवघ्या काही चेंडूत ते सामन्याची दिशा बदलून टाकतात. त्यामुळे गुजरात टायटन्सला आजचा सामना जिंकण्यासाठी या चौघांना मोठी खेळी करण्यापासून रोखावं लागेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.