GT vs MI IPL 2023 : ‘तू पोलार्डची जागा कधीच घेऊ शकत नाहीस’, Tim David वर मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा संताप
GT vs MI IPL 2023 Qualifier 2 : ही चूक महाग पडली, सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न भंगलं. टीम डेविड काल बॅटिंगमध्ये सुद्धा विशेष कमाल दाखवू शकला नाही. खरंतर त्यावेळी मुंबई इंडियन्सला गरज होती.
अहमदाबाद : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समधला सामना एकतर्फी झाला. गुजरातने मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सची टीम आता आपल्या दुसऱ्या आयपीएल विजेतेपदासाठी 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या एका प्लेयरने मॅचमध्ये मोठी चूक केली. ही चूक केली नसती, तर निकाल काही वेगळा लागला असता.
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या टिम डेविडने चूक केली. त्याची किंमत संपूर्ण टीमला चुकवावी लागली. टिम डेविडने या मॅचमध्ये एक कॅच सोडली. गुजरातच्या इनिंगमध्ये ख्रिस जॉर्डन सहावी ओव्हर टाकत होता. त्याच्या बॉलिंगवर टीम डेविडने शुभमन गिलची कॅच सोडली.
त्यानंतर दोनदा संधी मिळाली
त्यावेळी गिल फक्त 30 रन्सवर खेळत होता. इतकच नाही, शुभमन गिलला 8 व्या ओव्हरमध्ये सुद्धा दोनदा जीवनदान मिळालं. या संधीचा गिलने पुरेपूर वापर करुन घेतला. त्याने आपल्या आयपीएल करियरमधील तिसरं शतक ठोकलं.
This situation where MI fans miss The Lord Kieron Pollard.
Man would have kept all the hopes alive and fear for opps even after 7 wickets, if he had played today…!
Tim David will never replace POLLARD??♂️ pic.twitter.com/HmiVYsnEos
— Hail CSK? (@VjNithesh) May 26, 2023
फोर पेक्षा सिक्स जास्त
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी कॅच सोडून शुभमन गिलला संधी दिली. त्याने शानदार बॅटिंग केली. शुभमनने 60 चेंडूत 129 धावा फटकावल्या. त्याने 7 फोर आणि 10 सिक्स मारले. त्याच्या फलंदाजीच्या बळावरच गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला हरवलं.
Tim David:- Where is my full toss delivery??#LSGvMI pic.twitter.com/Wk7rlt6H9X
— Avinash droxtaa (@d_droxtaa) May 24, 2023
गुजरातच्या बॉलरने काढल्या 5 विकेट
गिलच्या 129 धावांच्या बळावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्समोर विजयासाठी 234 धावांच टार्गेट ठेवलं. कॅप्टन हार्दिक पांड्याने नाबाद 28 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईची संपूर्ण टीम 18.2 ओव्हर्समध्ये 171 रन्सवर ऑलआऊट झाली. मुंबई इंडियन्सकडून फक्त तीन फलंदाजांनी दुहेरी धावा केल्या. सूर्यकुमार यादव 38 चेंडूत 61 तिलक वर्मा 14 चेंडूत 43 धावा केल्या. शुभमन गिलनंतर मोहित शर्माने टीमच्या विजयात योगदान दिलं. त्याने 2.2 ओव्हर्समध्ये 10 धावा देऊन 5 विकेट काढल्या.