GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : गुजरात विरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी खरा क्वालिफायर सामना फक्त 12 ओव्हर्सचा असेल, कसा?
GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा फैसला फक्त 12 ओव्हरमध्ये होईल. याच 12 ओव्हर सामन्याची दिशा ठरवतील. या सीजनमध्ये मुंबई आणि गुजरातची टीम तिसऱ्यांदा आमने-सामने असेल.
अहमदाबाज : IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या टीम भिडतील. अहमदाबादमध्ये आज दुसरा क्वालिफाय़र सामना खेळला जाईल. आज जी टीम बाजी मारेल, तो संघ 28 मे रोजी फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळेल. हार्दिक पांड्याची गुजरात टायटनस् आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स टीम या सीजनमध्ये तिसऱ्यांदा आमने-सामने असतील. 25 एप्रिलला दोन्ही टीम्समध्ये पहिला सामना झाला होता. गुजरात टायटन्सने त्या मॅचमध्ये 55 रन्सनी बाजी मारली होती. त्यानंतर 12 मे रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 27 रन्सनी विजय मिळवला.
आता पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात दोन्ही टीम्स आमने-सामने असतील. मागच्या दोन सामन्यांवर नजर टाकली, तर मुंबई इंडियन्ससाठी खरा सामना फक्त 12 ओव्हर्सचा आहे. रोहित सेनेने 12 ओव्हर्समध्ये धावा कुटल्या, तर गुजरातच्या अडचणी वाढतील. अन्यथा या 12 ओव्हर्सचा पराभवाची स्क्रिप्ट लिहिली जाईल.
दोन्ही टीम्ससाठी या 12 ओव्हर महत्वाच्या
क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 12 ओव्हर्स महत्वाच्या आहेत. मोहम्मद शमी, राशिद खान आणि नूर अहमद 4-4 ओव्हर्स टाकतील. हे तीन गोलंदाज रोहित सेनेसाठी डोकेदुखी ठरु शकतात.
तिघांचे आकडे धडकी भरवणारे
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 15 सामन्यात 17.38 च्या सरासरीने 26 विकेट घेतल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे पर्पल कॅप आहे. दुसऱ्या नंबरवर गुजरातचा स्टार गोलंदाज राशिद खान आहे. त्याने 19 च्या सरासरीने 25 विकेट घेतल्यात. दोघांनी मिळून आतापर्यंत 51 विकेट घेतल्यात. नूर अहमदने 11 सामन्यात 14 विकेट घेतलेत. तिघेही मुंबईसाठी धोकादायक ठरु शकतात.
गुजरातकडून सर्वाधिक डॉट बॉल कोणी टाकले?
तिघांच्या विकेट्सचे आकडे बघूनच याचा अंदाज येतो. विकेटशिवाय ते धावगतीला सुद्धा लगाम घालतात. शमीने या सीजनमध्ये सर्वाधिक 182 डॉट बॉल टाकले आहेत.
गुजरातच्या मुंबईवरील पहिल्या विजयात सर्वाधिक योगदान कोणाच?
मुंबई इंडियन्सने भले गुजरात टायटन्स विरुद्ध मागचा सामना जिंकला होता. पण मागच्या सामन्यात मुंबईच्या 5 विकेट गेल्या होत्या. यात इशान किशन, रोहित शर्मा, नेहल वढेरा आणि टिम डेविड या चार विकेट्स राशिद खानने घेतल्या होत्या. पहिल्या लढतीत गुजरातने मुंबईवर 55 धावांनी विजय मिळवला होता. यात गोलंदाजांच योगदान होतं. मुंबईने कोणापासून जास्त सतर्क रहाव?
219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईला 152 धावांवर रोखलं होतं. इशान किशन, तिलक वर्मा यांची शिकार राशिद खानने केली होती. मुंबई इंडियन्सचा महागडा खेळाडू कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि टिम डेविड यांना नूर अहमदने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. ग्रीन आणि सूर्या दोघे शानदार फॉर्ममध्ये आहेत. अशावेळी त्यांनी जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.