GT vs PBKS IPL 2022: हे काय मित्रा, शुभमन गिल मैदानातच संदीप शर्मावर चिडला, VIDEO पहा, मैदानात काय घडलं?
GT vs PBKS IPL 2022: सामन्याच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली. शुभमन गिलने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने बॉल टॅप केला. धाव पूर्ण करण्यासाठी तो नॉन स्ट्राइकच्या दिशेने धावला.
मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडिमयवर पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये (PBKS vs GT) सामना सुरु आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतला आजचा 48 वा सामना आहे. या सामन्यादरम्यान गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) धावबाद झाला. खरंतर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) केलेल्या अचूक थ्रो मुळे तो रनआऊट झाला. पण शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परतत असताना पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मावर चिडला होता. संदीप शर्मामुळे आपण रनआऊट झालो, अशी त्याची भावना होती. ऋषी धवनने केलेल्या थ्रो ने स्टम्पसचा वेध घेतला. तो पर्यंत शुभमन गिल क्रीझमध्ये पोहोचू शकला नाही. दरम्यान हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. आतापर्यंत नऊ पैकी आठ सामने त्यांनी जिंकले आहेत.
तिसऱ्या षटकात ही घटना घडली
सामन्याच्या तिसऱ्या षटकात ही घटना घडली. शुभमन गिलने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने बॉल टॅप केला. धाव पूर्ण करण्यासाठी तो नॉन स्ट्राइकच्या दिशेने धावला. ऋषी धवनने तो चेंडू पकडला व थेट स्टम्पसवर फेकून मारला. ऋषीने चेंडू थ्रो केला, तेव्हा शुभमन क्रीझच्या जवळपासही नव्हता. त्यामुळे तो रनआऊट झाला.
पॅव्हेलियनमध्ये परतताना मागे फिरला व….
गिल रनआऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना मागे फिरला व संदीप शर्माकडे रागाने बघितलं. संदीप मध्ये आल्यामुळे आपण रनआऊट झालो, असं शुभमनचं म्हणणं होतं. खरंतर चेंडू टाकल्यानंतर संदीप फॉलो थ्रू मध्ये होता, तो अजिबात हलला नाही. तो तिथेच उभा होता. त्याची चूक नव्हती. चोरटी एकेरी धाव घेण्याचा कॉल चुकीचा होता.
WICKET!
Shubman Gill is run out for 9 runs.#GT lose their first.
Live – https://t.co/LcfJL3lO5i #GTvPBKS #TATAIPL pic.twitter.com/mtBQemzmE3
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2022
गुजरात टॉपवर
आज हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सचा संघ 16 गुणांसह पॉइंटस टेबलमध्ये टॉपवर आहे. आज गुजरातची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. शुभमन गिल (9) वृद्धीमान सहा (21) आणि हार्दिक पंड्या (1) लवकर बाद झाले.
हे बरोबर नाही मित्रा, मैदानातच शुभमन गिलचा पारा चढला क्लिक करुन VIDEO पहा
गुजरात टायटन्सची Playing – 11 हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदीमान सहा, शुभमन गिल, डेविड मिलर, राहुल तेवतिया, साई सुदर्शन, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्गुयसन, प्रदीप सांगवान आणि मोहम्मद शामी
पंजाब किंग्सची Playing – 11 मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षा, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह आणि संदीप शर्मा