GT vs PBKS Prediction Playing XI IPL 2022: प्रिती झिंटाच्या गालावरची खळी उद्या खुलणार की, नताशाचं विजयी सेलिब्रेशन पहायला मिळणार

GT vs PBKS Prediction Playing XI IPL 2022:गुजरात टायटन्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात गुजरातचा संघ सरस कामगिरी करतोय.

GT vs PBKS Prediction Playing XI IPL 2022:  प्रिती झिंटाच्या गालावरची खळी उद्या खुलणार की, नताशाचं विजयी सेलिब्रेशन पहायला मिळणार
preity zinta support to punjab kings
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 6:12 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) या सीजनमध्ये एक नवीन कॅप्टन पंजाब किंग्सचं (Punjab kings) नेतृत्व करतोय. मयंक अग्रवालकडे (Mayank Agarwal) या टीमची कॅप्टनशिप आहे. कॅप्टन बदलला पण टीमच्या प्रदर्शनात फारशी सुधारणा दिसलेली नाही. मागच्या सीजनसारखच या मोसमात प्रदर्शन सुरु आहे. आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सने अजूनपर्यंत प्रभावित करणारी कामगिरी केलेली नाही. संघाच्या कामगिरीत सातत्य नाहीय. आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यात फक्त तीन मॅचेसमध्ये त्यांनी विजय मिळवलाय. सहा सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. फलंदाजी किंवा गोलंदाजी कुठेही हा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, असं म्हणू शकत नाही. पंजाब किंग्सचा सामना उद्या मजबूत गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. पंजाब किंग्सच्या मालकांमध्ये प्रिती झिंटाचाही समावेश आहे.

मार्ग अधिक खडतर बन शकतो

गुजरात टायटन्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात गुजरातचा संघ सरस कामगिरी करतोय. गुजरातने पंजाब किंग्सला नमवलं, तर त्यांच प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. पंजाबचा आणखी एक पराभव त्यांचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर बनवू शकतो. दोन्ही टीम्समध्ये या सीजनमधला पहिला सामना झाला आहे. हा सामना गुजरातने जिंकला.

प्लेइंग- 11 मध्ये बदल करण्याची गरज

पंजाबच्या संघात मयंकचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. तो धावा करत नाहीय. जॉनी बेयरस्टोनेही निराश केलय. शिखर धवन आणि लियाम लिव्हिंग स्टोन या दोघांकडून अपेक्षा आहेत. ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पंजाबला आपल्या प्लेइंग- 11 मध्ये बदल करण्याची गरज आहे. बेयरस्टोला बाहेर बसवून पंजाबची टीम ओडियन स्मिथ आणि शाहरुख खानला संधी देऊ शकते. ओडियन स्मिथच्या समावेशामुळे पंजाब किंग्सला एक अतिरिक्त गोलंदाज मिळेल. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याने मागच्या सामन्यात दोन बदल केले होते. अभिनव मनोहर आणि साई सुदर्शनला संधी दिली होती. यश दयालच्या प्रदीप सांगवानला संधी दिली होती. दोघांनी आपल्या कामगिरीने प्रभावित केलं.

गुजरात टायटन्स Playing – 11

हार्दिक पंड्या (कॅप्टन), वृद्धीमान सहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, प्रदीप सांगवान, मोहम्मद शमी,

पंजाब किंग्स Playing – 11

मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षे, ओडियन स्मिथ/शाहरुख खान, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चाहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह,

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.