Fastest Ball in IPL 2022: फायनलमध्ये लॉकी फर्ग्यूसनने टाकला IPL इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू, उमरान मलिकला टाकलं मागे

IPL 2022 च्या फायनलमध्ये लॉकी फर्ग्यूसनने (Lockie Ferguson)इतिहास रचला. गुजरात टायटन्सच्या या गोलंदाजाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला.

Fastest Ball in IPL 2022: फायनलमध्ये लॉकी फर्ग्यूसनने टाकला IPL इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू, उमरान मलिकला टाकलं मागे
Lockie FergusonImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 9:53 PM

मुंबई: IPL 2022 च्या फायनलमध्ये लॉकी फर्ग्यूसनने (Lockie Ferguson)इतिहास रचला. गुजरात टायटन्सच्या या गोलंदाजाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना सुरु आहे. लॉकी फर्ग्यूसनने राजस्थानच्या डावातील पाचव्या षटकात 157.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू आहे. लॉकी फर्ग्यूसनने आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात वेगवान चेंडू राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला (Sanju Samson) टाकला. पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा कारनामा केला. संजू सॅमसन या चेंडूला स्पर्शही करु शकला नाही. या चेंडू आधी त्याने स्लोअर वन चेंडू टाकला होता. लॉकी फर्ग्यूसनने या सीजनमध्ये 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्या उमरान मलिकल मागे टाकलं.

शॉन टेटला टाकलं मागे

यंदाच्या सीजनमधला सर्वात वेगवान चेंडू उमरानने टाकला होता. पण आता ही कामगिरी लॉकी फर्ग्यूसनच्या नावावर आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू शॉन टेटने टाकला होता. टेटने आयपीएल 2011 मध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती. त्यावेळी 157.3 किमी प्रतितास वेग होता. पण लॉकीने त्यापेक्षा काही पॉइंट्स जास्त वेगाने चेंडू टाकला.

वेगवान चेंडू टाकण्यामध्ये तिसऱ्या स्थानावर

लॉकी फर्ग्यूसन टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्यामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. क्रिकेटच डाटा ठेवणाऱ्या क्रिकविजनुसार, टी 20 मध्ये ज्या गोलंदाजांनी जास्तीत जास्त 600 चेंडू टाकलेत, त्यात लॉकी तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचा सरासरी वेग 140 किमी प्रतितास आहे. शॉन टेट पहिल्या आणि बिली स्टेनलेक दुसऱ्या स्थानावर आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.