GT vs RR : साई सुदर्शनची धमाकेदार खेळी, राजस्थानसमोर 218 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Gujarat Titans vs Rajasthan Royals 1st Innings Highlights : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्ससाठी साई सुदर्शन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. गुजरातसाठी ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक 82 धावा केल्या. तर जोस बटलर आणि शाहरुख खान या दोघांनी निर्णायक खेळी करत गुजरातला 200 पार पोहचवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत छोटेखानी मात्र महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. आता राजस्थानचे फलंदाज या धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरतात का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
गुजरातची बॅटिंग
साई सुदर्शन याने 52 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 8 फोरसह 82 धावा केल्या. साईची ही या मोसमातील तिसरी अर्धशतकी खेळी ठरली. जोस बटलर याने 25 चेंडू 36 धावा केल्या. तर शाहरुखने 20 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 36 रन्सची भर घातली. राशिद खानने 4 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 12 धावा जोडल्या. तर राहुल तेवतिया याने 12 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 24 रन्स केल्या. या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. कर्णधार शुबमन गिल याने निराशा केली. गिलने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर शेरफेन रुदरफोर्डने 7 धावा केल्या.
राजस्थानकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी फझलहक फारुकी याचा अपवाद वगळता सर्व यशस्वी ठरले. तुषार देशपांडे आणि महीश तीक्षणा या दोघांनी 50 पेक्षा अधिक धावा लुटवल्या. मात्र ते विकेट घेण्यात यशस्वी ठरले. या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
राजस्थान रॉयल्ससमोर 218 धावांचं आव्हान
Innings Break!
Solid contributions from #GT batters power them to 217/6. 🎯#RR‘s chase on the other side ⏳
Scorecard ▶ https://t.co/raxxjzY9g7#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/MzhSnPVhJe
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2025
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.