GT vs RR Prediction Playing XI IPL 2022 Final: फायनलच्या लढाईत हे खेळाडू मैदानावर उतरणार, जाणून घ्या दोन्ही टीमची प्लेइंग इलेवन
IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये फायनलचा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) ही मॅच होईल.
मुंबई: IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन संघांमध्ये फायनलचा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) ही मॅच होईल. गुजरातची टीम पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होती. त्यांनी 14 पैकी 10 सामने जिंकले होते. राजस्थानचा संघ 14 पैकी 9 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर होता. पहिल्या क्वालिफायरमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने आले. त्यावेळी गुजरात टायटन्सने बाजी मारली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने राजस्थान रॉयल्सला 7 विकेटने हरवलं. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 189 धावांचं लक्ष्य गुजरातच्या संघाने 19.3 षटकात तीन विकेट गमावून पार केलं. गुजरातकडून डेविड मिलरने सर्वाधिक 38 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्स बदल करणार नाही
राजस्थान रॉयल्सने काल दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर सात विकेट राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला. सलामीवीर जोस बटलरने या मॅचमध्ये नाबाद 106 धावांची शतकी खेळी केली. गोलंदाजीमध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मेकॉयने शानदार प्रदर्शन केलं. राजस्थानने पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभव होऊनही, दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात बदल केला नव्हता. एखाद्या खेळाडू दुखापतग्रस्त नसेल, तर बदल होण्याची शक्यता अजिबात नाहीय.
गुजरात विजयी कॉम्बिनेशन कायम ठेवेल
गुजरात टायटन्सची टीमही आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करणार नाही. क्वालिफायरमध्ये ज्या कॉम्बिनेशनने विजय मिळवून दिला, तोच संघ घेऊन ते मैदानात उतरतील. क्वालिफायरच्या 1 सामन्यात गुजरातने राजस्थानला 7 विकेटने हरवलं होतं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा ओबेड मेकॉय,
गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्जारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी