GT vs SRH, IPL 2022: गुजरातला दुसरी विकेट मिळताच हार्दिकची बायको नताशाचं आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन, पहा VIDEO

GT vs SRH, IPL 2022: आज राहुल त्रिपाठीची दुसरी विकेट मिळाल्यानंतर नताशाने आपल्या स्टाइलमध्ये संघाला चिअरअप केलं. तिचा हा उत्साह कॅमेऱ्यानेही टिपला.

GT vs SRH, IPL 2022: गुजरातला दुसरी विकेट मिळताच हार्दिकची बायको नताशाचं आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन, पहा VIDEO
Natasha stankovic hardik pandya wife Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 9:04 PM

मुंबई: गुजरात टायटन्सचा सामना म्हटला की, नताशा स्टँकोविकची (Natasha stankovic) चर्चा होणं स्वाभाविक आहे. गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सामना कुठल्याही संघाबरोबर असो, स्टेडियममधला कॅमेरा मैदानाबरोबर नताशा बसलेल्या प्रेक्षक गॅलरीकडे फिरतोच. नताशा स्टँकोविक ही हार्दिक पंड्याची (Hardik pandya) पत्नी आहे. स्टेडियममधील तिच्या अदांवर कॅमेऱ्याचं आणि सोशल मीडियाचं अत्यंत बारीक लक्ष असतं. तिला झालेला आनंद कॅमेरा प्रत्येकवेळी टिपत असतो. स्टेडिममधला तिचा लूक, कपडे, अदा याची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होते. मागच्या कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात तिने चक्क डान्स केला होता. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सुनील नरेनने पाच धावांवर फर्ग्युसनकडे झेल दिला. त्यानंतर नताशाला आपला आनंद आवरता आला नाही. तिने स्टेडियममध्ये बसल्याजागी डान्स सुरु केला. त्यामुळे आजच्याही नताशाच्या प्रत्येक Reaction वर कॅमेऱ्याचं अत्यंत बारीक लक्ष आहे.

आपल्या स्टाइलमध्ये संघाला चिअरअप

आज राहुल त्रिपाठीची दुसरी विकेट मिळाल्यानंतर नताशाने आपल्या स्टाइलमध्ये संघाला चिअरअप केलं. तिचा हा उत्साह कॅमेऱ्यानेही टिपला. यंदाच्या आयपीएल सीजनला सुरुवात झाल्यापासून नताशा चर्चेमध्ये आहे. नताशाने हॉटेलच्या स्विमिंग पूलमधील तिचे काही फोटो, व्हिडिओ सुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिकच्या बरोबरीने नताशाचीही देखील तितकीच चर्चा आहे.

नताशाचं आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन, पहा VIDEO

हार्दिकही फॉर्ममध्ये

नताशाचा नवरा हार्दिक पंड्याही सध्या दमदार कामगिरी करतोय. त्याने आज 49 चेंडूत 67 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. हार्दिकने या सीजनमधली तिसरी हाफसेंच्युरी झळकवली. हार्दिक प्रत्येक सामन्यात कॅप्टन इनिंग्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. दुखापतीनंतर मैदानावर कमबॅक करणाऱ्या हार्दिकमध्ये एक वेगळा खेळाडू दिसतोय. तो संघासाठी जबाबदारी घेऊन खेळतोय.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.