GT vs SRH, IPL 2022: Hardik pandya फिटनेसबद्दल लपवाछपवी करतोय? SRH च्या 195 धावांमुळे हा प्रश्न निर्माण झालाय
GT vs SRH, IPL 2022: गुजरातच्या अन्य गोलंदाजांना SRH च्या फलंदाजांना रोखणं जमलं नाही. प्रथमच गुजरातची गोलंदाजी SRH ने फो़डून काढली. 20 षटकात त्यांनी सहाबाद 195 धावा केल्या.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) यंदाच्या सीजनमध्ये हार्दिक पंड्या (Hardik pandya) दमदार कामगिरी करतोय. गुजरात टायटन्सची कॅप्टनशिप मिळाल्यापासून तो अधिक जबाबदारीने खेळतोय. एक वेगळा हार्दिक पंड्या सर्वांना पहायला मिळतोय. खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहतोय. डावाला आकार देतोय. गुजरातच्या प्रत्येक विजयात महत्त्वाची भूमिका बजावतोय. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ टॉपवर आहे. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) डेब्यू केलाय, असं वाटतच नाहीय. सर्व बाजूंनी गुजरात टायटन्सचा संघ उजवा वाटतोय. यात हार्दिक पंड्या विशेष तेजाने चमकतोय. पण एक गोष्ट मात्र हार्दिक बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतेय, तो आहे त्याचा फिटनेस. हार्दिकच्या फिटनेसमुळे निश्चिच टीम इंडियाच्या चाहत्यांची चिंता वाढतेय. कारण आगामी टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता, हार्दिक पंड्याकडून खूप अपेक्षा आहेत. तो ज्या पद्धतीने खेळतोय, ते पाहता टीम इंडियासाठी आगामी काळात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
मागच्या दोन-तीन सामन्यात हार्दिकने काय केलय ते समजून घ्या
हार्दिक सर्व बाजूंनी दमदार वाटत असला, तरी तो गोलंदाजी करणारा का? हा मुख्य प्रश्न आहे. कारण आजही हार्दिक पंड्याने एकही ओव्हर टाकली नाही. हार्दिकने टॉसच्यावेळी जे उत्तर दिलं, त्यावरुनच तो गोलंदाजी करेल का? हा प्रश्न निर्माण झाला होता. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक दुखापतीमुळे खेळला नव्हता, कोलकातात विरुद्धच्या सामन्यातही त्याने 67 धावांची खेळी केली. पण दुसऱ्याडावात फिल्डिंगसाठी मैदानावर आला नाही. आजही आमच्याकडे गोलंदाजांची फौज आहे, गरज पडली, तर गोलंदाजी करेन अस म्हणाला होता.
इथे क्लिक करुन अभिषेक शर्माची 42 चेंडूतील 65 धावांची आतषी खेळी पहा VIDEO
धुलाई होत असताना हार्दिक फक्त बघत होता
आज खरंच त्याने गोलंदाजी करण्याची गरज होती. कारण शमीने पावरप्लेमध्ये दोन विकेट मिळवून दिल्या. पण गुजरातच्या अन्य गोलंदाजांना SRH च्या फलंदाजांना रोखणं जमलं नाही. प्रथमच गुजरातची गोलंदाजी SRH ने फो़डून काढली. 20 षटकात त्यांनी सहाबाद 195 धावा केल्या. सलामीवीर अभिषेक शर्माने 42 चेंडूत 65 आणि एडन मार्करामने 40 चेंडूत 56 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली.
लॉकी फर्ग्युसन सारख्या टॉप बॉलरला शशांक सिंहने मारलेला लाजबाव स्कूप SIX एकदा पहाच
लॉकी फर्ग्युसनच्या अखेरच्या ओव्हरमध्ये शशांक सिंहने फटकेबाजी केली. त्याने 6 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. त्यामुळे एसआरएचने 190 चा टप्पा ओलांडला. गुजरातच्या गोलंदाजांची अशी धुलाई होत असताना, हार्दिकने खरंतर बॉलिंग करायला पाहिजे होती. पण त्याने चेंडू हातात घेतला नाही, त्यामुळे त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय.