GT vs SRH, IPL 2022: आधी मार खाल्ला, नंतर काढली विकेट, शमीने दांडी गुली केली, तो VIDEO एकदा बघाच

GT vs SRH, IPL 2022: यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात T-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. मोहम्मद शमीचा सातत्याने फक्त कसोटी सामन्याच्या दृष्टीने निवड समितीकडून विचार होतोय. त्यामुळे हा आयपीएलचा सीजन त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे.

GT vs SRH, IPL 2022: आधी मार खाल्ला, नंतर काढली विकेट, शमीने दांडी गुली केली, तो VIDEO एकदा बघाच
वेगवान गोलंदाज तयार होत असल्याने मोहम्मद शमीला आनंदImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 8:29 PM

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) जबरदस्त गोलंदाजी करतोय. गुजरात टायटन्सचा तो एक प्रमुख आधारस्तंभ आहे. आज वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (GT vs SRH) आयपीएलमधला 40 वा सामना सुरु आहे. मोहम्मद शमीने आज पुन्हा एकदा आपला कॅप्टन हार्दिक पंड्याचा विश्वास सार्थ ठरवला. मोहम्मद शमीने सनरायजर्स हैदराबादच्या दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. पावरप्लेमध्ये विकेट मिळवणं गरजेचं असतं. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दबाव येतो. आज मोहम्मद शमीने तेच केल. त्याने पावरप्लेमध्ये (Power play) गुजरात टायटन्सला दोन मोठ्या विकेट मिळवून दिल्या. मोहम्मद शमीने आज गोलंदाजी करताना थोडा मार खाल्ला. पण दोन अप्रतिम चेंडू टाकून गुजरातच्या मार्गातील अडसर दूर केला.

या चेंडूला तोड नव्हती

शमीने आधी हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसनला अप्रतिम चेंडूवर क्लीन बोल्ड केलं. शमीने टाकलेल्या या चेंडूला तोड नव्हती. विलियमसन पाच धावांवर तंबूत परतला. त्यानंतर शमीने राहुल त्रिपाठीची विकेट काढली. खरंतर ही विकेट मिळण्याआधी राहुल त्रिपाठीने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. राहुल त्रिपाठीने आधी शमीच्या गोलंदाजीवर स्टेप आऊट होऊन सिक्स समारला, त्यानंतर दोन चौकार ठोकले. अखेर ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर राहुलला पायचीत पकडलं. पण त्यासाठी DRS चा आधार घ्यावा लागला. राहुल त्रिपाठीने 10 चेंडूत 16 धावा केल्या. मोहम्मद शमीने आतापर्यंत तीन ओव्हर्समध्ये 29 धावा देत दोन विकेट घेतल्या आहेत.

शमीसमोर विलियमसन हतबल,काठी वाजवली तो VIDEO इथे क्लिक करुन बघा 

फक्त कसोटी सामन्याच्या दृष्टीने विचार

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात T-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. मोहम्मद शमीचा सातत्याने फक्त कसोटी सामन्याच्या दृष्टीने निवड समितीकडून विचार होतोय. त्यामुळे हा आयपीएलचा सीजन त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे.

स्टेप आऊट होऊन राहुल त्रिपाठीने शमीला मारलेला लाजबाव SIX पहा VIDEO 

कारण इथे त्याने प्रभावी कामगिरी केली, छाप सोडली तर त्याच्यासाठी टीम इंडियाच्या T-20 संघाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. मोहम्मद शमी गोलंदाजी करताना दिशा आणि टप्पा बघितला, तर तो जास्त घातक गोलंदाज आहे. त्यामुळे मोहम्मद शमीसाठी आयपीएलचा हा मोसम खूप महत्त्वपूर्ण आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.