GT vs SRH Prediction playing XI IPL 2022: ‘या’ ऑलराऊंडरमुळे हैदराबादची ताकत वाढणार, हार्दिक विनिंग कॉम्बिनेशन बदलणार?
GT vs SRH Prediction playing XI IPL 2022: सनरायजर्स हैदराबादने सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. सलग पाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. पॉइंटस टेबलमध्ये हा संघ गुजरात पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबई: IPL 2022 मध्ये काही संघांनी आपल्या सातत्यपूर्ण खेळाने प्रभावित केलं आहे. सर्वांनाच या टीम्सनी आश्चर्याचा धक्का दिला आहे. यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आघाडीवर आहे. त्याच बरोबर सनरायजर्स हैदराबादचीही (SRH) दमदार कामगिरी सुरु आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने अनेक मोठ्या संघांना पराभवाचे धक्के देत अव्वल स्थान मिळवलय. हैदराबादने पहिल्या दोन पराभवानंतर विजयाचा मार्ग पकडला आहे. सतत विजयाची सवय जडलेले हे दोन संघ उद्या भिडणार आहेत. त्यामुळे उद्या एका संघाचा पराभव निश्चित आहे. बुधवारी दोन्ही संघ आमने-सामने येतील. दोन्ही संघांच्या प्रदर्शनावर एक नजर टाकूया. आयपीएलमध्ये डेब्यु करणाऱ्या गुजरात टायटन्सने सात सामने खेळले आहेत. ज्यात सहा सामन्यात विजय मिळवला आहे. सर्वात जास्त पॉइंटससह ही टीम पहिल्या स्थानावर आहे. गुजरातचा एकमेव पराभव हैदराबाद विरुद्धच झाला आहे.
गुजरातला एकच चिंता
सनरायजर्स हैदराबादने सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. सलग पाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. पॉइंटस टेबलमध्ये हा संघ गुजरात पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातची फलंदाजी आणि गोलंदाजी युनिट चांगला खेळ दाखवत आहे. ओपनिंगची गुजरातला थोडी चिंता आहे. कारण शुभमन गिल मागच्या काही सामन्यात अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही.
सुंदरच्या कमबॅकमुळे टीमला मजबुती मिळेल
सनरायजर्स हैदराबादसाठी सगळ्या गोष्टी हळूहळू अनुकूल होत आहेत. कॅप्टन केन विलियमसन अजून रंगात आलेला नाही. युवा फलंदाज अभिषेक शर्मा चांगली फलंदाजी करतोय. फलंदाजांची मधली फळी खरी ताकत आहे. संघातील चार वेगवान गोलंदाज प्रत्येकावर भारी पडतायत. वॉशिंग्टन सुंदर उद्या पुनरागमन करु शकतो. शशांक सिंह आणि जगदीशा सुचित यांच्या जागेवर तो फलंदाजीला येऊ शकतो.
GT vs SRH संभाव्य Playing 11
गुजरात – हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, वुद्धीमान सहा (विकेटकीपर), डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी आणि यश दयाल
हैदराबाद – केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह/वॉशिंग्टन सुंदर, जगदीशा सुचित, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक