Gujarat Foundation day: राशिद खान-हार्दिक पटेल खेळले गरबा, गुजरात-डे चं टायटन्सकडून जोरदार सेलिब्रेशन, पहा VIDEO
Gujarat Foundation day: फाऊंडेशन-डे च्या निमित्ताने गुजरातच्या फ्रेंचायजीने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात हार्दिक-राशिदसह अन्य खेळाडू जोरदार गरबा खेळले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) डेब्यु केला आहे. गुजरात टायटन्स एक नवीन संघ असूनही जोरदार प्रदर्शन करतोय. गुजरात टायटन्सचा संघ या सीजनमध्ये आतापर्यंत नऊ सामने खेळला असून आठ मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे. 16 गुणांसह गुजरात टायटन्सची टीम पॉइंटस टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सच्या टीमचा स्पर्धेत चांगला प्रवास सुरु आहे. काल 1 मे म्हणजे गुजरात फाऊंडेशन डे (Gujarat Foundation day) होता. गुजरात टायटन्सच्या टीमने हा दिवस खास पद्धतीने साजरा केला. यावेळी गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि उपकर्णधार राशिद खान पूर्णपणे गुजराती बनले होते. क्रिकेट बरोबरच फ्रेंचायजींकडून खेळाडूंसाठी वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.
हार्दिक-राशिद खेळले गरबा
फाऊंडेशन-डे च्या निमित्ताने गुजरातच्या फ्रेंचायजीने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात हार्दिक-राशिदसह अन्य खेळाडू जोरदार गरबा खेळले. राहुल तेवतिया आणि आशिष नेहराने सुद्धा दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात एकच प्रांत होते. 1 मे 1960 रोजी दोन्ही वेगवेगळी राज्य झाली. तेव्हापासूनच गुजरात फाऊंडेशन डे साजरा केला जातो. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा फिरकी गोलंदाज राशिद खानने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन गुजरात फाऊंडेशन डे च्या शुभेच्छा दिल्या. गुजरात दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी गुजरात डे असा मेसेज त्यांनी लिहिला होता.
The stage was set ? Our Titans were dressed ? And it was celebrations all the way ?#GujaratFoundationDay #SeasonOfFirsts #AboutLastNight pic.twitter.com/vVYqPAJN03
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 2, 2022
राशिद खानने घातली पगडी
गुजरात फ्रेंचायजीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात खेळाडू दांडिया खेळताना दिसतायत. यात राशिद खानने पगडी घातल्याचं दिसत आहे. गुजरात टायटन्सचा पुढचा सामना मंगळवारी आहे. पंजाब किंग्स विरुद्ध ही लढत आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना होईल. गुजरात टायटन्सने हा सामना जिंकल्यानंतर त्यांचं प्लेऑफ मधील स्थान निश्चित होईल.