GT vs CSK : CSK च काही खरं नाही, गुजरातकडे एमएस धोनीच्या तोडीच डोकं असलेला माणूस
GT vs CSK : CSK च्या विजयामध्ये धोनीचा चणाक्षपणा, बुद्धिमत्ता दडलेली असते. पण आता गुजरात टायटन्सकडे त्याच तोडीचा माणूस. त्याला घडवण्यात धोनीचा सुद्धा हात.
GT vs CSK IPL 2023 : भारतात कॉमिक्स कॅरेक्टर्सच्या विश्वात चाचा चौधरीची एक खास जागा आहे. चाचा चौधरीचं डोकं कॉम्प्युटरपेक्षा फास्ट समजलं जातं. क्रिकेट विश्वात बुद्धिमान कॅप्टनची चर्चा होते, तेव्हा पटकन ओठावर एमएस धोनीच नाव येतं. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्सने चार विजेतेपद मिळवली आहेत. आता धोनी समोर एक हुशार माणूस आहे. ज्याने बराच काळ त्याच्यासोबत घालवलाय. त्याच्याकडे चाच चौधरीसारख फास्ट डोकं आहे. तो धोनी आणि सीएसकेच्या अडचणी वाढवू शकतो.
IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये पहिला सामना होईल. हाच चाचा चौधरी आपल्या समजदारीने CSK ला चीत करण्याचा प्रयत्न करेल.
हुशारीने टीमला मिळवून दिलं विजेतेपद
धोनीच्या समोर असलेल्या त्याच्याच तोडीच्या हुशार माणसाच नाव आहे आशिष नेहरा. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि गुजरात टायटन्सचा तो मुख्य कोच आहे. मागच्या सीजनमध्ये पहिल्यांदा आशिष नेहरा कुठल्या टीमचा कोच बनला. त्याने गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळवून दिलं.
पडद्यामागे त्यानेच हार्दिकला घडवलं
गुजरातच्या यशामुळे हार्दिक पंड्या एक यशस्वी कॅप्टन म्हणून सर्वांसमोर आला. पडद्यामागे आशिष नेहराच्या मार्गदर्शनाने हार्दिकला एक चांगला कॅप्टन बनवण्यात मदत केली. धोनी अचूक डावपेचांसाठी ओळखला जातो. आशिष नेहराने तेच डावपेच वापरले. नवीन फ्रेंचायजी म्हटली की, दबाव असतो. नेहराने खेळाडूंवर तो दबाव येणार नाही, याची काळजी घेतली. त्यासाठी माहोल तयार केला.
कुठल्या युवा खेळाडूंना संधी दिली?
आशिष नेहराने यश दयाल, साई सुदर्शन, साई किशोर सारख्या युवा खेळाडूंना टीममध्ये संधी दिली. त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगात आपल्या प्रदर्शनाने टीमच्या विजयात भूमिका बजावली.
धोनीच्या नेतृत्वाखाली त्याचं पुनरागमन
आशिष नेहरा स्वत: धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वगुणांची त्याला कल्पना होती. धोनीच्या सपोर्टमुळेच स्वत: नेहराने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलीय. नेहराने भारताच्या टी 20 टीमध्ये पुनरामगन करत 2016 चा टी 20 वर्ल्ड कप सुद्धा खेळला होता. 2015 मध्ये सीएसकेकडून खेळताना नेहराने 16 मॅचमध्ये 22 विकेट काढल्या. खेळाडू जुना असो, वा नवीन त्याला पाठबळ दिले पाहिजे हे नेहराला कळतं मागच्या सीजनमध्ये GT vs CSK मध्ये कोण जिंकलेलं?
मागच्या सीजनमध्ये दोनवेळा गुजरात आणि चेन्नईची टीम आमने-सामने आली. दोन्हीवेळा नेहराच्या गुजरातने धोनीच्या चेन्नईवर मात केली. आता नेहरा पुन्हा एकदा धोनी आणि सीएसकेच्या अडचणी वाढवून विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा प्रयत्न करेल.