GT vs DC Live Score, IPL 2022: गुजरात टायटन्सचा सलग दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सचा पराभव

| Updated on: Apr 03, 2022 | 12:07 AM

gujarat titans vs delhi capitals live score in marathi: दोन्ही संघ आपला पहिला सामना जिंकले आहेत. हीच विजयी लय कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

GT vs DC Live Score, IPL 2022: गुजरात टायटन्सचा सलग दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सचा पराभव
IPL 2022: गुजरात टायटन्स वि दिल्ली कॅपिटल्स

GT vs DC IPL 2022: ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने (Guajarat Titans) आयपीएल 2022 स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. आज दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन केलं. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi capitals) 14 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. याआधी गुजरातने मागच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं.

Key Events

दिल्लीच्या संघात एकमेव बदल

दिल्ली कॅपिटल्सने आज टीममध्ये एक बदल केला आहे. कमलेश नागरकोटीला बाहेर बसवलं असून बांग्लादेशच्या मुस्ताफिजुर रहमानला संधी दिली आहे.

गुजरातने एकही बदल केला नाही

गुजरात टायटन्सने विजयी संघ कायम ठेवला आहे. एकही बदल केलेला नाही.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 02 Apr 2022 11:27 PM (IST)

    गुजरात टायटन्सचा सलग दुसरा विजय

    गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या.

  • 02 Apr 2022 11:17 PM (IST)

    कुलदीप-मुस्तफीझूर शेवटची जोडी मैदानात

    दिल्लीच्या 18 षटकात नऊ बाद 145 धावा झाल्या आहेत. कुलदीप-मुस्तफीझूर ही शेवटची जोडी मैदानात आहे.

  • 02 Apr 2022 11:14 PM (IST)

    दिल्लीच्या लागोपाठ दोन विकेट

    हिटर रोव्हमॅन पॉवेल पाठोपाठ खलील अहमदची मोहम्मद शमीने काढली विकेट.

  • 02 Apr 2022 11:09 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 18 चेंडूत 30 धावांची गरज

    17 षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या सात बाद 142 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूत विजयासाठी 30 धावांची गरज.

  • 02 Apr 2022 11:06 PM (IST)

    राशिद खानने दिला झटका, दिल्ली कॅपिटल्सची सातवी विकेट

    शार्दुल ठाकूरच्या रुपात राशिद खानने दिल्ली कॅपिटल्सची सातवी विकेट काढली आहे. दिल्लीची सात बाद 137 अशी अवस्था झाली आहे.

  • 02 Apr 2022 10:53 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, कॅप्टन ऋषभ पंत OUT

    दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला आहे. कॅप्टन ऋषभ पंत 43 धावांवर OUT झाला आहे. लॉकी फर्ग्युसनने मनोहरकरवी झेलबाद केले. दिल्लीच्या पाच बाद 118 धावा झाल्या आहेत. त्यांना विजयासाठी 35 चेंडूत 54 धावांची आवश्यकता आहे.

  • 02 Apr 2022 10:38 PM (IST)

    ललित यादवची महत्त्वाची विकेट गुजरातला मिळाली

    अखेर ललित यादवची महत्त्वाची विकेट गुजरातला मिळाली. तो रनआऊट झाला. ललित यादवने 25 धावा केल्या. चार बाद 95 अशी दिल्लीची स्थिती आहे.

  • 02 Apr 2022 10:34 PM (IST)

    ऋषभ पंत-ललित यादवने सावरला दिल्ली कॅपिटल्सचा डाव

    11 षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या तीन बाद 86 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 29 आणि ललित यादव 25 धावांवर खेळतोय.

  • 02 Apr 2022 10:01 PM (IST)

    लॉकी फर्ग्युसनचा दिल्लीला आणखी एक धक्का

    लॉकी फर्ग्युसनने एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले आहेत. पृथ्वी शॉ पाठोपाठ मनदीप सिंह तंबूत परतला आहे. फर्ग्युसनने त्याला 18 धावांवर वाडेकरवी झेलबाद केले.

  • 02 Apr 2022 09:55 PM (IST)

    पृथ्वी शॉ OUT

    गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का दिला आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर 10 धावांवर विजय शंकरकरवी झेलबाद झाला.

  • 02 Apr 2022 09:47 PM (IST)

    हार्दिकने दिल्लीला दिला पहिला झटका

    दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला सुरुवात झाली आहे. दिल्लीचा सलामीवीर टिम सायफर्टला हार्दिक पंड्याने मनोहरकरवी झेलबाद केले. सायफर्टने तीन धावा केल्या. मनदीप सिंग आणि पृथ्वी शॉ मैदानात आहे.

  • 02 Apr 2022 09:14 PM (IST)

    दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य

    प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सने निर्धारीत 20 षटकात 171 धावा केल्या आहेत. गुजरातकडून शुभमन गिलने 46 चेंडूत 84 धावांची स्फोटक खेळी केली. त्याशिवाय हार्दिक पंड्या 31, डेविड मिलर नाबाद 20 आणि राहुल तेवतियाने 14 धावा केल्या.

  • 02 Apr 2022 09:07 PM (IST)

    शुभमन गिलच्या 46 चेंडूत 84 धावा

    19 षटकांचा खेळ झाला असून गुजरात टायटन्सच्या चार बाद 167 धावा झाल्या आहेत. शुभमन गिलने 46 चेंडूत 84 धावांची स्फोटक खेळी केली. यात सहा चौकार आणि चार षटकार होते. डेविड मिलर-राहुल तेवतियाची जोडी मैदानात आहे.

  • 02 Apr 2022 08:44 PM (IST)

    15 षटकात तीन बाद 120 धावा

    पंधरा षटकात गुजरात टायटन्सच्या तीन बाद 120 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या आणि शुभमन गिलने तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. हार्दिक 31 रन्सवर आऊट झाला. शुभमन आज क्लासिक फलंदाजी करत आहे. त्याने 39 चेंडूत 67 धावा केल्या आहेत. यात सहा चौकार आणि दोन षटकार आहेत.

  • 02 Apr 2022 08:06 PM (IST)

    Raj Thackeray live : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण Live

    तीन वर्षापूर्वी गुढी पाडवा मेळावा झाला होता

    दोन वर्षे मेळावा घेता आला नाही

    आज गजबजलेलं शिवतीर्थ आधी सामसूम होती

    एक माणूसही फिरताना दिसत नव्हता

    कोरोनाची भिती आणि पोलिसांचा दांडिया

    पोलिसांनी कोरोनाकाळात अतिशय उत्तम काम केलं

    कोणताही विचार न करता रस्त्यावर होते

  • 02 Apr 2022 08:05 PM (IST)

    कुलदीप यादवने पहिल्याच चेंडूवर विजय शंकरला केलं बोल्ड

    कुलदीप यादवने त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विजय शंकरला क्लीन बोल्ड केलं. विजय शंकरने 13 धावा केल्या. गुजरातच्या दोन बाद 44 धावा झाल्या आहेत.

  • 02 Apr 2022 08:01 PM (IST)

    शुभमन गिल-विजय शंकरची जोडी मैदानात

    सहा षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 44 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल 26 आणि विजय शंकर 13 धावांवर खेळतोय.

  • 02 Apr 2022 07:56 PM (IST)

    मॅथ्यू वेडच्या रुपाने गुजरात टायटन्सचा पहिला विकेट

    मॅथ्यू वेडच्या रुपाने गुजरात टायटन्सचा पहिला विकेट गेला आहे. आता शुभमन गिल आणि विजय शंकरची जोडी मैदानात आहे. पाच षटकात गुजरात टायटन्सच्या एक बाद 38 धावा झाल्या आहेत.

Published On - Apr 02,2022 7:53 PM

Follow us
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.