GT विरुद्ध LSG, IPL 2022: थरारक सामन्यात राहुल तेवतियाचा चौकार, गुजरातचा विजयी शुभांरभ

| Updated on: Mar 29, 2022 | 12:09 AM

gujarat titans vs lucknow super giants live score in marathi आयपीएल 2022 सीजनचा आज चौथा सामना आहे. दोन नवीन संघ डेब्यू करत आहेत.

GT विरुद्ध LSG, IPL 2022: थरारक सामन्यात राहुल तेवतियाचा चौकार, गुजरातचा विजयी शुभांरभ
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

मुंबई: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर (GT vs LSG) पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) चौकार ठोकून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. खरंतर या सामन्यात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. लखनौची सुरुवात खराब झाली होती. पण त्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीने चांगली फलंदाजी करुन डाव सावरला. संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. त्यानंतर गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मधल्याषटकात लखनौच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली होती. पण तरीही अखेरीस गुजरात टायटन्सने बाजी मारली. लखनौने दिलेले 159 धावांचे आव्हान पाच विकेट आणि दोन चेंडू राखून पार केले.

Key Events

दोन नवीन संघांचा डेब्यू

लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ आज आमने-सामने आहेत. त्यांचा हा पहिलाच सामना आहे.

हार्दिक पंड्यावर वर लक्ष

गुजरातचं कर्णधारपद भूषवणाऱ्या हार्दिक पंड्यावर सर्वांच लक्ष असेल. तो आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवतोय.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Mar 2022 11:28 PM (IST)

    थरारक सामन्यात राहुल तेवतियाचा चौकार, गुजरातचा विजयी शुभांरभ

    शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. राहुल तेवतियाने चौकार ठोकून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुल तेवतिया आणि डेविड मिलरमध्ये पाचव्या विकेटसाठी झालेली 60 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. राहुलने नाबाद (40) मिलरने 21 चेंडूत 30 धावा केल्या.

  • 28 Mar 2022 11:20 PM (IST)

    गुजरातला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता

    शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. राहुल तेवतिया (36) मैदानात आहे.

  • 28 Mar 2022 11:12 PM (IST)

    थरारक सामन्यात अखेर डेविड मिलर OUT

    अत्यंत मोक्याच्या क्षणी गुजरात टायटन्सचा डेविड मिलर आऊट झाला आहे. त्याच्यामुळेच गुजरात सामना जिंकण्याच्या स्थितीत आहे. आवेश खानच्या गोलंदाजीवर कव्हर्समध्ये केएल राहुलने झेल घेतला. त्याने 21 चेंडूत 30 धावा केल्या.

  • 28 Mar 2022 11:07 PM (IST)

    सामना रंगतदार स्थितीत, गुजरातला विजयाची संधी

    रवी बिष्णोईच्या एक षटकात तेवतिया-मिलरने केला हल्लाबोल, गुजरातच्या चार बाद 130 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूत विजयासाठी 28 धावांची आवश्यकता.

  • 28 Mar 2022 11:02 PM (IST)

    मिलर-तेवतियाचा हल्लाबोल, दीपक हुड्डाच्या एक ओव्हरमध्ये 22 धावा

    दीपक हुड्ड्याच्या एका ओव्हरमध्ये मिलर-तेवतियाने 22 धावा वसूल केल्या. सध्या गुजरातच्या चार बाद 119 धावा झाल्या आहेत.

  • 28 Mar 2022 10:57 PM (IST)

    फिरकी गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवलं

    पंधरा षटकात गुजरातच्या चार बाद 91 धावा झाल्या आहेत. लखनौच्या फिरकी गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवलं आहे.

  • 28 Mar 2022 10:50 PM (IST)

    36 चेंडूत विजयासाठी 71 धावांची आवश्यकता

    14 षटकात गुजरात टायटन्सच्या चार बाद 88 धावा झाल्या आहेत. डेविड मिलर आणि राहुल तेवतियाची जोडी मैदानात आहे. 36 चेंडूत विजयासाठी 71 धावांची आवश्यकता आहे.

  • 28 Mar 2022 10:43 PM (IST)

    हार्दिक पाठोपाठ मॅथ्यू वेड OUT, हुड्डाने केलं क्लीन बोल्ड

    दोन विकेट लवकर गेल्यानंतर हार्दिक पंड्या आणि मॅथ्यू वेडने डाव सावरला होता. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 57 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्या (33) कुणाल पंड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर वेडला (30) ला हुड्डाने क्लीन बोल्ड केलं.

  • 28 Mar 2022 10:13 PM (IST)

    मॅथ्यू वेड-हार्दिक पंड्याची जोडी मैदानात

    गुजरात टायटन्सच्या सहा षटकात दोन बाद 44 धावा झाल्या आहेत. मॅथ्यू वेड आणि हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे. वेड 14 आणि हार्दिक 19 धावांवर खेळतोय. विजय शंकरला चार धावांवर चामीराने क्लीन बोल्ड केलं.

  • 28 Mar 2022 09:42 PM (IST)

    गुजरात टायटन्सला मोठा झटका

    पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर गुजरात टायटन्सला मोठा झटका बसला आहे. चामीराने शुभमन गिलला भोपळाही फोडू दिला नाही. दीपक हुड्डाकरवी त्याला शुन्यावर बाद केलं. एक बाद चार अशी टायटन्सची स्थिती आहे.

  • 28 Mar 2022 09:27 PM (IST)

    लखनौने गुजरातला दिलं 159 धावांच लक्ष्य

    29 धावात चार विकेट गमावणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने जोरदार कमबॅक केलं आहे. निर्धारीत 20 षटकात त्यांनी सहा बाद 158 धावा केल्या. दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीमुळे लखनौला कमबॅक करता आलं. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. दीपक हुड्डाने (55) तर आयुष बदोनीने (54) धावा केल्या. लखनौकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 25 धावा देत तीन विकेट घेतल्या.

  • 28 Mar 2022 09:17 PM (IST)

    षटकार खेचून हाफ सेंच्युरी

    आयपीएलमध्ये डेब्यु करणाऱ्या आयुष बदोनीने षटकार खेचून अर्धशतक झळकावलं. त्याने चार चौकार आणि तीन षटकार लगावले. 19 षटकात लखनौच्या पाचबाद 149 धावा झाल्या आहेत.

  • 28 Mar 2022 09:11 PM (IST)

    बॅकफूटवर गेलेल्या लखनौचं जोरदार कमबॅक

    लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या चार विकेट झटपट गमावल्या. पण दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीने डाव सावरला. दीपक हुड्डा 55 धावांवर बाद झाला. सध्या 18 षटकात पाच बाद 139 धावा झाल्या आहेत.

  • 28 Mar 2022 08:46 PM (IST)

    दीपक हुड्डाची शानदार हाफ सेंच्युरी

    पहिल्या चार विकेट लवकर गेल्यानंतर दीपक हुड्डाने लखनौ सुपर जायंट्सचा डाव सावरला. लखनौच्या चार बाद 87 धावा झाल्या आहेत. दीपक हुड्डाने शानदार हाफ सेंच्युरी झळकवली आहे. 37 चेंडूत त्याने 50 धावा केल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार आहेत.

  • 28 Mar 2022 08:19 PM (IST)

    गुजरात टायटन्सचं सामन्यावर वर्चस्व

    गुजरात टायटन्सचं सामन्यावर वर्चस्व आहे. आठ षटकात लखनौ सुपर जायंट्सच्या चार बाद 36 धावा झाल्या आहेत.

  • 28 Mar 2022 08:17 PM (IST)

    हार्दिक पंड्याने अखेर गोलंदाजी केली

    आजच्या सामन्यात हार्दिक पंड्याने अखेर गोलंदाजी केली. त्याने पहिलं षटक टाकताना फक्त एक धाव दिली.

  • 28 Mar 2022 08:03 PM (IST)

    लुइसचा घेतलेला सुपर्ब झेल एकदा पहाच.

    शुभमन गिलने लुइसचा घेतलेला सुपर्ब झेल एकदा पहाच.

  • 28 Mar 2022 08:02 PM (IST)

    मोहम्मद शामीला कसं खेळायचं?

    मोहम्मद शामीने लखनौ सुपर जायंट्स आणखी एक झटका दिला आहे. त्याने मनीष पांडेला क्लीन बोल्ड केलं. मनीष पांडेने 6 धावा केल्या. लखनौची सध्या चार बाद 29 अशी स्थिती आहे.

  • 28 Mar 2022 07:56 PM (IST)

    लखनौ बॅकफूटवर, वरुण एरॉनने दिला तिसरा झटका

    गुजरात टायटन्सची जबरदस्त गोलंदाजी सुरु आहे. वरुण एरॉनच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने लुइसचा 10 धावांवर जबरदस्त झेल घेतला.

  • 28 Mar 2022 07:48 PM (IST)

    मोहम्मद शामीचा भेदक मारा, LSG ची दुसरी विकेट

    मोहम्मद शामीने एका अप्रतिम चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डि कॉकला क्लीन बोल्ड केलं. त्याने फक्त सात धावा केल्या. दोन बाद 14 अशी लखनौची स्थिती आहे.

  • 28 Mar 2022 07:42 PM (IST)

    लुइस-डिकॉकची जोडी मैदानात

    दोन षटकात लखनौ संघाच्या एक बाद  नऊ धावा झाल्या आहेत. लुइस (6) आणि डिकॉकची (3) जोडी मैदानात आहे.

  • 28 Mar 2022 07:35 PM (IST)

    पहिल्याच चेंडूवर लखनौला झटका, केएल राहुल शुन्यावर OUT

    IPL स्पर्धेतील नवीन संघ असलेल्या गुजरात टायटन्सने पहिल्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सला झटका दिला आहे. लखनौचा कॅप्टन केएल राहुलला मोहम्मद शामीने भोपळाही फोडू दिला नाही. विकेटकीपरकरवी झेलबाद केले.

  • 28 Mar 2022 07:26 PM (IST)

    अशी आहे लखनौची प्लेइंग – 11

    केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डिकॉक, एविन लुइस, मनीष पांडे, दीपक हुड्डा, कुणाल पंड्या, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, आवेश खान, दुष्मंता चमीरा, मोहसीन खान,

    ;

  • 28 Mar 2022 07:24 PM (IST)

    अशी आहे गुजरातची प्लेइंग – 11

    हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण एरॉन, मोहम्मद शमी

  • 28 Mar 2022 07:21 PM (IST)

    हार्दिक पंड्याने टॉस जिंकला

    गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आहे. गुजरात टायटन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Mar 28,2022 7:19 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.