IPL 2023 GT vs MI Qualifier 2 : मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यावेळी पाऊस पडला तर…? आयपीएल फायनलमध्ये कोण खेळणार?; जाणून घ्या टू द पॉईंट
मुंबई आणि गुजरात दरम्यानच्या आजच्या क्वालिफायर -2 सामन्यात पाऊस पडला तर कोणता संघ फायनलमध्ये जाईल? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये मॅच रद्द झाली तर काय नियम आहेत? असा प्रश्नही सर्वांना पडला आहे.
अहमदाबाद : आयपीएलमध्ये आज क्वालिफायर – 2 चा महामुकाबला होणार आहे. हार्दीक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स दरम्यान हा महामुकाबला रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सामन्यातूनच सेमी फायनलला कोण जाणार? याचं चित्र स्पष्ट होणार आहे.
आजचा मुकाबला जो संघ जिंकणार त्याला 28 मे रोजी होणाऱ्या आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळणार आहे. रोहित शर्मा किंवा हार्दीक पांड्या या दोघांपैकी एकाच्या संघाचा भिडत एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स सोबत होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिममध्ये हार्दीक पांड्याच्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता पांड्याचा संघ क्वालिफायर -2 मध्ये आला आहे. तर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात लखनऊला 81 धावांनी पराभूत केलं होतं. या सामन्यात आकाश मधवालने 3.3 षटकात 21 धावा देऊन तीन विकेट घेतले होते. त्यामुळे मुंबईला क्वालिफायर -2मध्ये पोहोचता आलं आहे.
पाऊस पडला तर असे होतील समीकरण
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स दरम्यानच्या सामन्यात पाऊस झाला आणि मॅच रद्द झाली तर गुजरात टायटन्स न खेळता फायनलमध्ये पोहोचेल. आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये गुजरातचा संघ टॉपला होता. गुजरातने 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकले आहेत. त्यांचे पॉइंट्स 20 होते. त्यामुळे गुजरातचा संघ 0.809 च्या नेट रन रेटने आपलं स्थान निर्माण केलं होतं.
दुसरीकडे मुंबई संघाने 14 सामन्यात 16 अंक मिळवले आहेत. मुंबईने -0.044 नेट रन रेटने प्लेऑफमध्ये आपलं स्थान बळकट केलं होतं. त्यामुळेच पाऊस होऊन सामना रद्द झाला तर गुजरातचा संघ फायनलमध्ये जाईल. हा नियम आयपीएलच्या प्लेऑफमध्ये लागू होतो. कारण त्यात रिझर्व्ह डेची तरतूद नाहीये.
अहमदाबादचं हवामन काय सांगतं?
आयएमडीच्या वेबसाईटवर अहमदाबादचं आजचं हवामान दाखवण्यात आलं आहे. अहमदाबादमध्ये आज किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस असेल. तर कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश स्वच्छ असेल. त्यामुळे मुंबई आणि गुजरातच्या दरम्यान जोरदार मुकाबला होईल असं सांगितलं जातं. पण हवामानाचा काहीच भरवसा देता येत नाही. वातावरण कधीही बदलू शकतं. त्यामुळे संध्याकाळी जर वातावरणात बदल झाला आणि सामना सुरू असताना पाऊस झाला तर मग वरील नियम लागू होतील, असं सूत्रांनी सांगितलं.