भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, टीम इंडियाच्या क्रिकेटपटूवर मजुरी करण्याची वेळ
अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी अप्रतिम खेळ करत देशाचं नाव उंचावर नेलं. पण आज त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती आल्यानंतर सर्वांनाच त्यांचा विसर पडला आहे.
नवसारी : नुकतीच टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic Games 2020) पार पडली. भारताने 7 पदकं पटकावली. पदक विजेत्या भारतीय खेळाडूंवर सरकार, विविध संस्था अक्षरश: पैशाचा पाऊस पाडत आहेत. या सर्व खेळाडूंनी देशाचा सन्मान वाढवल्याने त्यांच्यावर अशाप्रकारे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पण आपल्या देशात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मान वाढवला. पण पुढे जाऊन सरकार, समाज सर्वांनाच त्याचा विसर पडल्याने त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती आली आहे. असे खेळाडू मेहनत कष्ट करुन अगदी गरीबीचे जीवन जगत आहेत. अशीच एक दुखद कथा आहे भारताला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रिकेटपटूची जो सध्या मजदूरी करुन पोट भरत आहे.
अंतिम 11 मध्ये असणारा नरेश तुमदा
तर ही कथा आहे 2018 सालच्या अंध खेळाडूंच्या क्रिकेट विश्वचषकाची (2018 Blind Cricket World Cup) यावेळी भारतीय संघातील एक महत्वाचा खेळाडू होता नरेश तुमदा (Naresh Tumda). गुजरातच्या नवसारी (Gujarat Navsari) मधील नरेश तुमदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील खेळाडू होता. दुबईत शारजाह येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानच्या 308 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताला विश्व चषक जिंकवून दिला होता.
गुजरातच्या मुख्यमंत्र्याकडे मदतीची मागणी, अद्यापही मदत नाही
नरेश तुमदा सध्या मजुरांप्रमाणे काम करुन स्वत:सह कुटुंबाच पोट भरत आहे. भारताला अंध व्यक्तींचा क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणारा नरेश आज पोटाची खळगी भरण्यासाठी नवसारीत (Navsari) 250 रुपये रोंजदारीवर काम करत आहे. यावर बोलताना तो म्हणाला, “मी प्रतिदिवस 250 रुपये कमवतो. मी आतापर्यंत तीन वेळा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी गेलो आह. मला एखादी सरकारी नोकरी मिळेल का? अशी विनंती केली. पण अजूनपर्यंत मला कोणतंच सकारात्मक उत्तर आलेल नाही”
Gujarat: Naresh Tumda, part of team that helped India win 2018 Blind Cricket World Cup, now works as a labourer in Navsari to earn livelihood
“I earn Rs 250 a day. Requested CM thrice but didn’t get reply. I urge govt to give me job so that I can take care of my family,” he said pic.twitter.com/NK4DFO6YYC
— ANI (@ANI) August 8, 2021
इतर बातम्या
रोहित शर्मासोबत खेळता खेळता बनला ‘हिटमॅन’,’या’ डावखुऱ्या फलंदाजाने 10 चेंडूतच संपवला सामना
एबी डिव्हिलियर्सवर रबाडाबरोबर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप, खुद्द एबीडीचं स्पष्टीकरण, म्हणतो…
(gujarats naresh tumda part of team that won 2018 blind cricket world cup for india now works as a labourer)