एकवेळचा स्लोअर, यॉर्कर गोलंदाजीचा ‘बादशाह’, पण आता गावस्करांनाही ‘तो’ संघात खटकतोय

स्विंग आणि अचूक टप्पा हे त्याचं बलस्थान. त्याच बळावर त्याने अत्यंत किफायती गोलंदाजी करुन अनेक बलाढ्य संघांना धक्के दिले.

एकवेळचा स्लोअर, यॉर्कर गोलंदाजीचा 'बादशाह', पण आता गावस्करांनाही 'तो' संघात खटकतोय
bhuvneshwar kumar instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 7:10 AM

मुंबई: स्विंग गोलंदाजीचा विषय निघाला की, सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो भुवनेश्वर कुमार. (bhuvneshwar kumar) पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या पदार्पणाच्या पहिल्या सामन्यापासूनच भुवनेश्वरने आपल्यातील स्विंग गोलंदाजीच्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली. दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची (Swing bowling) क्षमता आणि अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याचं कौशल्य यामुळे भुवनेश्वर कुमारने अल्पावधीत टीम इंडियात स्वत:च स्थान पक्क केलं. भुवनेश्वरला भारतीय क्रिकेट टीममध्ये लाडाने भुवी म्हणतात. मध्यमगती गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमारकडे वेग नसला, तरी स्विंग आणि अचूक टप्पा हे त्याचं बलस्थान. त्याच बळावर त्याने अत्यंत किफायती गोलंदाजी करुन अनेक बलाढ्य संघांना धक्के दिले. पाच फेब्रुवारी 1990 रोजी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये भुवनेश्वर कुमारचा जन्म झाला. भुवनेश्वरचे वडील उत्तर प्रदेश पोलीस दलात उपनिरीक्षक होते.

लष्करी अधिकारी बनायचं होतं भुवीला समजायला लागलं, तेव्हा त्याला लष्करी अधिकारी बनण्याची इच्छा होती. त्याला भारतीय लष्करात जाऊन देशसेवा करायची होती. पण शांत आणि लाजऱ्या स्वभावाच्या भुवनेश्वरसाठी नियतीने काही वेगळाच विचार करुन ठेवला होता. भुवनेश्वरला क्रिकेट खेळण्यासाठी त्याची बहिण रेखाने प्रोत्साहित केले, पाठिंबा दिला. 13 वर्षाच्या भुवनेश्वरला सर्वप्रथम ती क्रिकेट अकादमीत घेऊन गेली. त्यानंतर भुवनेश्वरने अत्यंत वेगाने क्रिकेटचं कौशल्य आत्मसात केलं.

सचिनला शुन्यावर आऊट केलं वयाच्या 17 व्या वर्षी 2007 मध्ये भुवनेश्वरने उत्तर प्रदेशकडून बंगाल विरुद्ध रणजी पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या क्रिकेटपटुंना त्रास देण्याआधी 2008-09 च्या रणजी मोसमात त्याने चक्क सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद केलं होतं. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सचिन शुन्यावर बाद होण्याची ती पहिलीच वेळ होती. भुवनेश्वर त्यावेळी 19 वर्षांचा होता. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर मागे वळून बघितलं नाही.

डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टी20 सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने नासीर जमशेदला बाद केलं. त्यानंतर त्याने उमर अकमल आणि मोहम्मद हाफीजला बाद केलं. त्या सामन्यात त्याने चार षटकात नऊ धावा देत तीन विकेट घेतल्या. त्याच दौऱ्यात त्याने पाकिस्तान विरुद्धच वनडेमध्ये पदार्पण केलं. पाकिस्तान विरुद्धच्या या मालिकेनंतर भुवनेश्वरने कधी मागे वळून बघितलं नाही.

2013 मध्ये चेन्नईत बॉर्डर-गावस्कर स्पर्धेद्वारे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या सामन्यात नवव्या विकेटसाठी त्याने धोनीसोबत 140 धावांची भागीदारी केली. गोलंदाजी बरोबरच भुवनेश्वरमध्ये उपयुक्त फलंदाजी करण्याचीही क्षमता होती. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा भक्कम आधारस्तंभ राहिलेला भुवनेश्वर आता मात्र तितका प्रभावी वाटत नाहीय.

गावस्कर भुवनेश्वरबद्दल म्हणतात…. “भुवनेश्वर कुमारने भारतीय क्रिकेटमध्ये उत्तम योगदान दिलय. पण मागच्यावर्षी आणि आता तसंच आयपीएल टी-20 मध्येही तो महागडा गोलंदाज ठरला. सुरुवातीच्या षटकांमध्ये नाही पण अखेरच्या षटकांमध्ये त्याने धावा दिल्या. उत्तम यॉर्कर आणि स्लो बॉल टाकण्याची त्याची क्षमता आहे. पण आता त्याची ती गोलंदाजी सुद्धा चालत नाहीय. प्रतिस्पर्धी संघ तुमचा अभ्यास करुन उतरतो, तेव्हा असं घडतं. अशा प्रकारची गोलंदाजी कशी खेळायची हे त्यांना माहित असतं. त्यामुळे आता दुसऱ्या गोलंदाजाचा शोध घेण्याची वेळ आलीय” असं मत काही दिवसांपूर्वी गावस्करांनी व्यक्त केलं होतं.

संबंधित बातम्या: KL Rahul: घरात शुभकार्य असल्यामुळे केएल राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये खेळत नाहीय? Shaik Rasheed: कीटकनाशक विकणाऱ्याचा मुलगा आज अंडर 19 टीमचा स्टार, दत्तक घेऊन घडवलेल्या मुलाची गोष्ट Icc under 19 cricket world cup: सेंच्युरी, पाच विकेट घेणाऱ्या अक्रमचा हा ‘चक्रम’ करुन सोडणारा SIX नक्की पाहा VIDEO

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.