Birthday Special: विश्वचषकाच्या सामन्यात कर्णधाराची तुफान खेळी, 17 षटकार ठोकत 148 धावा, पाहा VIDEO
2019 च्या एकदिवसी विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत एका संघातच्या कर्णधाराकडून एका डावात 17 षटकार ठोकत विक्रम रचण्यात आला होता. हा खेळाडू आयपीएलमधील एका संघाचाही कर्णधार आहे.
लंडन : कर्णधार म्हणजे कोणत्याही संघाचा कणाचं असतो. सामन्यात कितीही कठीण परिस्थिती आली तर संघाचा आत्मविश्वास वाढता ठेवण्यासाठी कर्णधाराला कायम सकारात्मक दृष्टीकोन ठेवून खेळावं लागतं. त्यात जर कर्णधार केवळ रणनीतीनेच नाही तर आपल्या खेळानेही सर्वांची मनं जिंकू लागला तर क्या बात! अशीच खेळी केली होती, 2019 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने (Eoin Morgan).
इयॉनचा आज वाढदिवस असून त्याने 2019 च्या विश्वचषकात अफगाणिस्तान संघाविरोधात एका सामन्या धडाकेबाज अशी 148 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे त्याने या डावात 17 षटकार ठोकले होते. कोणत्याही एकदिवसीय सामन्यातील हे एका डावात खेळाडूने ठोकलेले सर्वाधिक षटकार होते. इयॉनच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीने (ICC) त्याला शुभेच्छा देत त्याच्या या अविस्मरणीय खेळीची एक झलक सर्वांसोबत शेअर केली आहे.
Happy birthday to England’s white-ball captain, Eoin Morgan ?
Relive his explosive knock of 148 from the 2019 ICC Men’s @cricketworldcup, which included 17 sixes – the most in an ODI innings ??️pic.twitter.com/j6unuzthTa
— ICC (@ICC) September 10, 2021
केकेआरच्याही अनोख्या शुभेच्छा
मॉर्गन हा आयपीएलमधील (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा कर्णधार असून त्याला केकेआरनेही खास शुभेच्छा दिल्या आहेत. केकेआरने त्याला कॅप्टन फॅन्टॅस्टीक, कॅप्टन रिलायबल, कॅप्टन मारवलंस अशा अनेक उपमा देत त्याचा फोटो कॅप्टन अमेरिका या सुपरहिरोप्रमाणे एडिट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
??????? ?????????. ??????? ????????. ??????? ??????????. ?#HappyBirthday #KKR @Eoin16 pic.twitter.com/187X4wwXrZ
— KolkataKnightRiders (@KKRiders) September 10, 2021
इतर बातम्या
T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती
(Happy birthday to Englands captain Eoin Morgan who won 2019 world cup to team)