मोहम्मद सिराज कसा खेळणार? विराटला प्रश्न; हरभजन सिंगने भारतात बसून चुटकीसरशी प्रॉब्लेम सोडवला!

मोहम्मद सिराजला अंतिम 11 मध्ये कशी संधी द्यायची याची चिंता विराट कोहलीला सतावते आहे. हरभजन सिंहने मोहम्मद सिराजला कसं खेळवायचा याचा मार्ग स्पष्ट करुन सांगितला. (Harbhajan Singh Demand Mohammed siraj in WTC Final Team)

मोहम्मद सिराज कसा खेळणार? विराटला प्रश्न; हरभजन सिंगने भारतात बसून चुटकीसरशी प्रॉब्लेम सोडवला!
हरभजन सिंग आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 11:59 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्यासाठी आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीला एक मोठी चिंता सतावत आहे. सध्या संघाकडे अंतिम 11 मध्ये खेळवण्यासाठी 4 खमके वेगवान गोलंदाज आहेत. मात्र दोन फिरकीपटू खेळवायचे असल्यास चौघांपैकी एका वेगवान गोलंदाजाला बसवावे लागणार आहे. त्यात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) अंतिम सामन्यात खेळवण्यासाठी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) उत्सुक असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे इतर वेगवान गोलंदाजामधील एका खेळाडूला विश्रांती द्यावी लागू शकते. अशातच विराटचा प्रॉब्लेम हेरुन टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) विराटला खास सल्ला देत त्याचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सोडवला आहे. (Harbhajan Singh Demand Mohammed siraj in WTC Final Team)

काय म्हणाला हरभजन?

मोहम्मद सिराजला अंतिम 11 मध्ये कशी संधी द्यायची याची चिंता विराट कोहलीला सतावते आहे. हरभजन सिंहने मोहम्मद सिराजला कसं खेळवायचा याचा मार्ग स्पष्ट करुन सांगितला. पीटीआयशी बोलताना तो म्हणाला, “की जर मी कॅप्टन असतो तर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मी तीन वेगवान गोलंदाजांसह उतरलो असतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी माझी पहिली पसंती असती तसंच मी ईशांत शर्माच्या जागी मोहम्मद शिराजला खेळवलं असतं. इशांत एक शानदार गोलंदाज आहे परंतु पाठीमागच्या काही मॅचेसचा परफॉर्मन्स पाहता माझं मत मी सिराजच्या पारड्यात टाकलं असतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली सिराजची कामगिरी नक्कीच नजरेआड करण्यासारखी नाही.”

हरभजनने असा सोडवला विराटचा प्रॉब्लेम

“एखाद्या महत्त्वाच्या सामन्यावेळी अंतिम अकरा खेळाडू निवडताना हे ध्यानात घेतलं पाहिजे की त्या खेळाडूचा सध्याचा फॉर्म कसा आहे… मला वाटतं की या तत्त्वानुसार पाहिलं तर सध्या सिराज इशांत शर्माला उजवा आहे. त्याचा फॉर्म, त्याचा फिटनेस, त्याची बॉलिंग करण्याची स्टाईल आणि आत्मविश्वास हे सगळंच लाजवाब आहे. मला वाटतं हेच गुण त्याला अंतिम सामन्यात खेळण्यासाठी पुरेसे आहेत”, असं हरभजन म्हणाला

“पाठीमागच्या सहा महिन्यांपासून त्याच्या बॉलिंगकडे पाहिलं असता तो विकेट टेकर बोलर म्हणून समोर आला आहे. याची झलक त्यांने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दाखवून दिली आहे. फक्त त्याला संधी हवी आहे.संधीचं सोनं करण्यात तो माहीर आहे. गेल्या काही महिन्यात त्यांने हे दाखवून देखील दिलं आहे. आता जर अंतिम सामन्यात त्याला जर संधी मिळाली तर तो संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीॅ, असंही तो म्हणाला.

…तर तो न्यूझीलंडचं खेळणं मुश्किल करु शकतो!

“मी असं म्हणत नाही ती इशांत शर्माकडे प्रतिभा नाही किंवा क्षमता नाही. ईशांत शर्मा मागील काही काळापासून भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे पण जर अंतिम सामन्याच्या पिचवर घास असेल तर सिराज कधीही घातक साबित होऊ शकतो. न्यूझीलंडला तो खेळणं मुश्किल करु शकतो”, असा विश्वास हरभजनने व्यक्त केला आहे.

विराटच्या निर्णयाकडे लक्ष

आता अंतिम सामन्यात कोणत्या गोलंदजांसह विराट मैदानात उतरतो, खरंच इशांतला मैदानाबाहेर बसवून विराट मोहम्मद सिराजला संधी देतो का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

(Harbhajan Singh Demand Mohammed siraj in WTC Final Team)

हे ही वाचा :

WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता

Video : इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन सुरु, ऋषभ पंत पाडतोय षटकारांचा पाऊस

WTC Final: न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकाचा भारतीय संघाला ‘गुरु मंत्र’, ‘या’ त्रिकुटाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.