Harbhajan Singh : असं कसं ? हरभजन सिंग सुद्धा रोहित शर्माशी असहमत
Harbhajan Singh : रोहित शर्माची 'ती' मागणी हरभजन सिंगला सुद्धा नाही पटली. रोहित शर्माने फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर WTC बद्दल एक वेगळ मत मांडलं. क्रिकेट विश्वात ते अनेकांना पटलेलं नाही.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला. सलग दुसऱ्यांदा भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर रोहित शर्माने फायनलबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण केलय. रोहित शर्माच हे मत क्रिकेट विश्वातील अनेकांना पटलेलं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला.
फायनलनंतर रोहित शर्माने एक वक्तव्य केलं. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. रोहित शर्माच हे मत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सनेही धुडकावून लावलं.
रोहित शर्मा काय म्हणतो?
रोहित शर्माने WTC च्या फायनलवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. फायनलमध्ये 3 मॅच पाहिजे, असं रोहितच म्हणणं आहे. एका फायनलने विजेतेपदाचा निर्णय घेऊ नये. 3 फायनल मॅच खेळवाव्या असं रोहित शर्माच मत आहे.
पॅट कमिन्स काय म्हणतो?
पॅट कमिन्सच्या मते फायनलसाठी एक मॅच पुरेशी आहे. रोहित शर्माच्या विचारावर आता हरभजन सिंगने सुद्धा आपलं मत मांडलय. फायनलमध्ये 3 मॅच हव्यात का? न्यूझीलंड आणि इंग्लंडची टीम असती, तर ते सुद्धा हेच म्हणाले असते का? असं हरभजन सिंग म्हणाले.
#TeamIndia fought hard but it was Australia who won the match.
Congratulations to Australia on winning the #WTC23 Final.
Scorecard ▶️ https://t.co/0nYl21pwaw pic.twitter.com/hMYuho3R3C
— BCCI (@BCCI) June 11, 2023
WTC फायनल पुरेशी
“3 फायनल योग्य नाहीत. एकच फायनल पुरेशी आहे. वनडे वर्ल्ड कपची एक फायनल असते, तशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची एक फायनल. फुटबॉलमध्ये सुद्धा एकच फायनल असते” असं हरभजनने सांगितलं. टुर्नामेंट महिन्याभरापेक्षा जास्त चालत नाही
हरभजन सिंगने जे मत मांडलं, त्या बद्दल काही जणांनी त्याला ट्रोल सुद्धा केलं. कारण हरभजनने ज्या स्पर्धांचा उल्लेख केला, त्या मॅचचा रिजल्ट एकदिवसात लागतो. कुठलीटी टुर्नामेंट महिन्याभरापेक्षा जास्त चालत नाही. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2 वर्ष सुरु असते. प्रत्येक टीम वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळते.